Posts

Showing posts from March, 2019

नाटकात काम करतानाच इच्छा मृत्यू येणारे नटवर्य ‘शंकर घाणेकर’ (shankar ghanekar)

Image
सडये-पिरंदवणेचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे विनोदवीर म्हणून ख्याती पावलेल्या नटवर्य कै.शंकर घाणेकर यांचा तारखेनुसार दि.20 मार्च व तिथीनुसार तुकाराम बीज हा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने जागविलेल्या या शंकरस्मृती... ख रा नाट्यकर्मी आपल्या आयुष्यात दोन इच्छा बाळगतो, एक त्याला कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ नाटकात आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारायला मिळावी, आणि दुसरी इच्छा आपल्याला मरण हे नटेश्वराच्या दरबारात नाटकात काम करता करता रंगभूमीवर यावे.. यातील पहिली इच्छा सर्वस्वी नटावरच अवलंबून असली, तरी दुसरी इच्छा मात्र नटेश्वरावरच अवलंबून आहे. रत्नागिरीचे सुपुत्र नटवर्य शंकर घाणेकरांना असेच रंगभूमीवर भाग्यशाली मरण आले, अशा या नटरंगी रंगलेल्या नटवर्याची ही कहाणी.. कोकणात नाटकवेड ओतप्रोत भरलेलं आहे. अजूनही कोकणातल्या खेड्यापाड्यात झापातल्या  थेटरातली नाटकं मोठ्या हौशीनं हौशी कलाकार सादर करतात. याच हौशी रंगभूमीतून शंकर घाणेकर उदयाला आले, अन् मराठी रंगभूमीचे ‘नटवर्य’ झाले. रत्नागिरी तालुक्यातील सडये-पिरंदवणे हे शंकर घाणेकरांचे जन्मगाव. रत्नागिरी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर गणपतीपुळयाकडे