Posts

Showing posts from August, 2019

गांगोबा-भराडीन-आदिष्टीच्या सानेवरून..

मु.भावेआडम हे रत्नागिरी तालुक्यातील तसं कुठे लेखी नसलेलं गाव माझं दुहेरी आजोळ आहे. गोरिवले आणि घवाळी अशी दुहेरी भावकी माझी आजोळ घरं आहे. याशिवाय इतरही बरीच नातीगोती याच गावात आहे. ती अशी एकत्र असल्याने एकाचवेळी भेटू शकतात, म्हणून जायलाही आवडतं. शिमगोत्सव हा या गावाचा लोकोत्सव. पार्वती घवाळीणीच्या कडेवर बसून मी इथला शिमगोत्सव पाहत आलो आहे. तो पाहण्याचं भाग्य आनंदाचं. दोन वर्षापूर्वी आडमच्या शिमग्याला गेलो होतो. त्यानंतर जाणे झाले नाही. यंदा योग जुळून आला आणि गांगोच्या चरणी माथा टेकला. पौर्णिमेला गांगोबा-आदिष्टीचा शिमगा सानेवर साजरा झाला. शिमगा संपला.. मी आलो, पण मन मात्र आदिष्टीच्या निर्जन सानेवर ठेवून आलोय. झरझरणारी वार्‍याची झुळुक अजूनही त्या मनाला घरी आणावीशी वाटत नाही.. यंदाच्या शिमग्यात इथं एक आधुनिक बदल दिसला. चाकरमान्यांचा ओढा या शिमग्यात मोठा असतो. यावर्षीही तो नटून-थटून आला होता. मात्र यावेळी बहुतेकसा चाकरमानी आपल्या दुचाकीवर बसून आला होता. सानेवर खूप गाड्या लागलेल्या. मी चालणारा माणूस. मला दगड-धोंड्यातून चालायला आवडतं. पण मामा म्हणाला, गाडीवरून जाऊ. आदिष्टीच्या कातळावरच्या द
सडये-पिरंदवणे-वाडाजून:  एक संस्कृती दर्शन उशाला ‘सडा’, पायथ्याला ‘मोडा’ मधी गाव वसलंय न्यारं.. स्वागत कमान, हिरवं रानं स्थळ ते ‘तांबड-पीर’.. उसळे पाणी, गर्द रानी रोखून धरी वारं.. ‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ.. ‘सडये’ गावाच्या सीमेवर..॥धृ॥ पळपळ कुरली, सळसळ बोयरं गरजे ‘कांदळतीर’.. ‘मळ्याची शेती’, ‘पुळणीची माती’ शेत पिकतंय भरपूर.. ‘आडाचं पाणी’, ‘खेळ्यांची गाणी’ गाती गोड गळा शाहीर.. ‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ.. ‘सडये’ गावाच्या सीमेवर..॥1॥  येई‘रवळनाथ’, पडते ‘थाप’ स्वारी फिरे घरोघर.. ‘सोमेश्वरी’ सत्ता, ‘सुंकाई’ माता कृपा ठेवी गावावर.. साठ्यांची ‘जोगेश्वरी’, देखण्या मंदिरी होई शक्तीचा जागर.. ‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ.. ‘सडये’ गावाच्या सीमेवर..॥2॥ आई ‘भराडीण’, गावाची रखवालीन जाखमाता क्षेत्रावर.. देवस्थानी आसन, करती पुजन नांदे ‘धुमकांचा’ वठार.. गणपती पुजता, चाकरमानी येती गर्जे भजनांचा ‘सुस्वर’.. ‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ.. ‘सडये गावाच्या सीमेवर...॥3॥ उंच डोंगरी, मुर्ती साजिरी ‘टोळवाडी’ वसे ‘मोरेेश्वर’.. क्षणभर बसता, प्रसन्न चि