Posts

Showing posts from April, 2021

भराडणीची अरण्ययात्रा!

Image
भराडणीची अरण्ययात्रा! श्री क्षेत्र भराडणी रत्नागिरीची ‘कातळशिल्प’ गेल्या काही वर्षात खूप चर्चेत आली आहेत. सरकार माध्यमातून त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्नही चालू झाले आहेत. माझी जन्मभूमी सडये-पिरंदवणेच्या सड्यावर-कातळावरही मुबलक कातळशिल्पे आहेत, त्यामुळे ‘कातळशिल्प’ हा विषय माझ्यादृष्ट्रीने कुतूहलाचा ठरला होता. गेेले कित्येक वर्षे त्यांचा शोध घेण्याचे आढावे आमच्या ‘रात्रीच्या बैठकीत’ ठरत होते, पण घडत काही नव्हते.  यंदाच्या नवरात्रीत मी सडये-पिरंदवणे परिसरातील मातृदेवतांचा शोध घेणारी लेखमालिका ब्लॉगवर सुरू केली. ती खूप जणांना आवडली होती. त्यातील काही मातृदेवता मी पाहिल्या होत्या. काही ऐकीव माहितीच्या होत्या. त्याही पहायच्या होत्या, पण घडत नव्हते. नवरात्रीदरम्यानच्या ‘रात्रीच्या बैठकीत’ हा मुद्दा ऐरणीवर आला. बैठकीचे मेंबर आण्णा धुमक, बाळआण्णा धुमक, आप्पा धुमक, गुरू धुमक, मारूती धुमक, मी, चंपूआत्ते.. आणि इतर सारेच बोलू लागले, आणि ठरले.  जांगलदेव सारा कातळ धुंडाळायचा म्हणजे त्याला चांगला मार्गदर्शक हवा. आप्पा धुमक त्यासाठी विनाअट तयार झाले, त्यांचा तो नित्याचा मार्ग होता. कोरोनाचा काळ असल्य