Posts

Showing posts from March, 2022

राधा हीे मथुरे बाजारा चालली...!

Image
कोकणचा सांस्कृतिक आढावा घेताना त्याची सुरूवात रत्नागिरीतल्या ‘नमन-खेळे, जाखडी’ या लोककलांपासून करावी लागेल. किंबहूना नमन-खेळे हीच रत्नागिरीची खरी सांस्कृतिक ओळख आहे. आज मनोरंजनाची शेकडो साधनं आज हजर झाली असली तरीही या दोन्ही लोककला पुर्वीइतक्याच आजही ताज्या फडफडीत आहेत. पुर्वीइतकीच त्यांना आजही लोकप्रियता लाभते आहे. शिमगा जवळ आला की संकासूर, नटवा, गोमू, रावण अशी लाकडी सोंग आणि मथुरेला जाणारी गौळण पहायला आजही गावागावांतून तुंबळ गर्दी होते. आता तर नमनाचे व्यवसायिक प्रयोगही होवू लागले आहे.  आता नाटकातही स्त्रिया भूमिका साकारू लागल्या. पण नमन- दशावतारात मात्र आजही पुरूषच स्त्री भूमिका साकारतात. यातच या कलेचं वेगळेपण टिकून राहिले आहे. लोकांना काय आवडतं याची नाडी नमन- खेळ्यांनी अगदी अचूक ओळखली आहे, त्यामुळेच नव्या चित्रपटातील उडत्या गाण्यांचा प्रभाव पहायला मिळेल. आणि म्हणूनच दिवसेंदिवस ही लोककला नवं रूप घेत आहे. इतके परिवर्तन अन्य कुठल्या लोककलेनं स्विकारले नसेल. या परिवर्तन स्विकारण्याच्या वृत्तीमुळेच आज ही लोककला बर्‍यापैकी टिकून आहे. अशाच या नमन खेळ्यातील ‘खास गौळण’ तुमच्यासमोर सादर करीत