Posts

Showing posts from May, 2023

श्री सुंकाई मंदिर कलशारोहण सोहळा

Image
  श्री  सुंकाई मंदिर कलशारोहण सोहळा  रत्नागिरी तालुक्यातील सडये-पिरंदवणे-वाडाजूनचे ग्रामदैवत श्री सुंकाई देवस्थानचा मंदिर कलशारोहण सोहळा थाटात पार पडला. यानिमित्ताने काढण्यात आलेली कलश मिरवणूक तिन्ही वाड्यांच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी ठरली. लहानापासून आबालवृध्दांपर्यंत मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाले होते. सडये-पिरंदवणे-वाडाजून गावांचे ग्रामदैवत म्हणून ख्याती असलेल्या श्री सुंकाई मंदिराची देखणी वास्तू ग्रामस्थ, भाविक, दानशूरांच्या देणगीतून उभारण्यात आली आहे. या मंदिराचा शनिवार दि.18 रोजी कलशारोहण सोहळा पार पडला. तत्पुर्वी मंदिराच्या कलशाची भव्त मिरवणूक सडये गावातून काढण्यात आली.  तिन्ही वाड्यांची ढोलपथक, लेझीमपथक, यासंह सडयेतील तरुण, तरुणींनी तिन्ही वाड्यांच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविले. यात लहान मुलांनी गणपतीचे कुटुंब ही संकल्पना साकारली होती. तर जयश्री कुर्टे यांनी झाशीची राणी साकारुन इतिहास जागा केला. अंजली धुमक, सुशिल धुमक, स्वरित धुमक यांच्या छत्रपती शिवराय-जिजाऊ दर्शनाने सार्या शोभायात्रेत विरश्री संचारली होती. अमोल पालये यांनी आणलेल्या संकासुराने अवघ्या

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

Image
हा.. हा.. म्हणता सडयेतील विद्यार्थी गुणगौरवाला एक तप उलटलं. खर्‍या अर्थाने आज गुणगौरव ‘नांदता’ झाला आहे. या कार्यक्रमामुळे सडयेची शैक्षणिक ‘क्वालिटी’ प्रथमच सर्वांसमोर आली. याआधी हे असं होत नव्हतं. ते घडलं. यातून विद्यार्थ्यांना जी अफाट प्रेरणा मिळाली, तीला तोड नाही. बारा वर्षापुर्वी गावात एकही ‘सायन्स’चा विद्यार्थी नव्हता. आज तो आहे. बारा वर्षापुर्वी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ म्हणजे काय ते गावाला ठावूक नव्हतं. आज या कार्यक्रमामुळे ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ करणार्‍या पोरांची फळी तयार होत आहे.  या कार्यक्रमाचे विशेष हे की, कमालीचे चोख नियोजन. त्यात कधीच ढिसाळपणा दिसला नाही. या कार्यक्रमात मुळातच सुरूवात करताना कार्यक्रमाची ध्येयं, धोरणं ठरवून घेतलेली होती, आणि त्यानुसार वाटचाल घडत राहिली. हा सारा प्रवास रम्य असला तरी याची सुरूवात खडतर होती. या प्रवासाची वाटचाल या गुणगौरवाचा शुभंकर म्हणून तप पुर्तीनिर्मित्त.. सन 2009.. कॉलेजला असल्यामुळे डोक्यात अगदी तेव्हापासूनच नवं काही करण्याच्या कल्पना सुचत होत्या. त्याचदरम्यान शिवलकरवाडीतील प्रतिष्ठित नागरिक श्री. हरिश्चंद्र शिवलकर हे अचानक भेटले. आदल्याच वर्षी