वाडाजूनच्या सड्यावर 30 कातळशिल्पांचा खजिना!
दिवाळीदिवशी वाडाजूनच्या सड्यावर शोधला 30 कातळशिल्पांचा खजिना! सडयेच्या तरूणांनी शोधली मानवासह रेड्यांची मोठाली पावलं, गुढ चाव्या, प्राणी आणि मडके सहभागी तरूण आणि तरूणी. रत्नागिरी : नरकचतुर्दशी म्हणजे पहाटेचे अभ्यंगस्नान, दिवाळी फराळ आणि फटाक्याची आतषबाजी.. हा सारा नेहमीचा रिवाज टाळत सडयेतील तरूणांनी सलग तिसर्या वर्षी नरकचतुर्दशी दिवशी कातळशिल्प शोधयात्रा काढली. या शोधयात्रेतून सडये-वाडाजूनच्या सड्यावर थोडाथोडका नव्हे, तर तब्बल तीसेक ठाशीव, सुस्पष्ठ कातळशिल्पांचा समुह आढळून आला. छोटी, मध्यम आणि मोठाली अशी एकूण 10 रेड्यांची पावलं या ठिकाणी आढळून आली आहेत. 10 मानवाची पावलं आढळून आली आहेत, तर 2 मोठाल्या चाव्याकृती आकृत्या, 2 प्राणी, 1 मडके अशी 30 चित्रे प्रथमच आढळली आहेत. सडयेतील तरूण मंडळी दरवर्षी दिवाळीनिमित्त पदयात्रा काढत असतात. यावर्षीची पदयात्रा वाडाजून सड्यावरील ‘रेडेबावलं’ या गुढकथांनी प्रसिध्द असलेल्या ठिकाणी गेली होती. बारा रेड्यांची जोतं आणि बारा माणसांच्या दुर्घटनेच्या कथित दुर्घटनेठिकाणी जावून या तरूणांनी सर्व अंधश्रध्दांना मुठमाती देण्याचा प्रयत्न या यात्रेनिमित्त केला. य