Posts

आठवी माळ : श्री देवी ईटलाई

Image
आठवी माळ : श्री देवी ईटलाई आजच्या आठव्या माळेत आज माहिती घेऊया श्री देवी मानाईप्रमाणेच आद्य मातृदेवता असलेल्या श्री ईटलाई या देवतेला. ईटलाई हीसुध्दा सडये-पिरंदवणे-बसणी या महालातील प्रमुख प्राचीन देवता आहे, आणि बसणी पंचायतन देवस्थानांच्या जिर्णोध्दार कार्यानंतर ती नव्याने दृष्टीपथात आली आहे. यापूर्वी श्री मानाई व श्री ईटलाई या दोन्ही देवता दुर्लक्षित होत्या. सध्या त्या स्वतंत्र मंदिरात विराजमान झाल्याने त्यांची ओळख पुन्हा नव्याने सर्वांना घडू लागली आहे. बसणीतील श्री महालक्ष्मी-रवळनाथ पंचायतन देवस्थानापैकी श्री देव रवळनाथ महाराजांच्या मंदिरातच रवळनाथांच्या गाभार्‍याशेजारीच श्री देवी ईटलाईची स्थापना करण्यात आली आहे. श्री ईटलाई देवीची मुर्ती पाषाणाची असून ती नव्याने अतिशय, सुबक, देखणी घडविण्यात आली आहे. ही नव्याने रवळनाथांच्या शेजारी स्थापन करण्यात आली असली, तरी ती नवी देवता नाही. रवळनाथांच्या कार्यक्षेत्रातील ती रवळनाथा इतकीच जूनी, प्राचीन देवता आहे.  काही अभ्यासकांच्या मते, ईटलाई-ईटलादेवीचा अपभ्रंश ‘शितला’ देवी असा झाला असावा, असे म्हटले जाते. ईटलाई देवतेचा विठ्ठल या देवतेशी काहीही स...

सातवी माळ : श्री देवी मानाई

Image
सातवी माळ : श्री देवी मानाई आजच्या माळेत माहिती घेऊया, श्री देवी मानाईची. मानाई हीसुध्दा सडये-पिरंदवणे-बसणी या महालातील प्रमुख देवता. कालपर्यंत ती दुर्लक्षित राहिल्याने सहसा कुणाला ठाऊक नव्हती, मात्र अलिकडेच बसणी येथे मानाई स्वतंत्र मंदिरात विराजमान झाली आहे. बसणीतील महालक्ष्मी-रवळनाथ पंचायतन देवस्थानात श्री देवी मानाईचे छोटेखानी, टुमदार मंदिर उभारण्यात आले आहे. यापुर्वी तीला स्वतंत्र मंदिर नसल्याने एका ती बाजूला होती, आणि ती कुणाच्या नजरेस येत नव्हती. बसणीतील चंदरकर परिवाराने पुढाकार घेऊन तीच्यासाठी सुंदर-सुरेख वास्तू उभारली आहे, आणि त्यात श्री देवी मानाई विराजमान झाल्याने मानाई ही नवी देवी मानली जाऊ लागली आहे, वस्तूत: ती नवी देवता नाही, ती रवळनाथा इतकीच जूनी, प्राचीन देवता आहे.  शस्त्र धारण करणार्‍या मानाईचे ग्रामरक्षण हा कार्यविभाग आहे.  त्यामुळे ती रवळनाथांच्या शेजारी आहे. बसणीचे रवळनाथ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या सहकारी देवता वाघजाई, नवलाई, पावणाई (केळ्ये) या येतात. या जशा रवळनाथाच्या ग्रामरक्षणातील सहकारी देवता आहेत, तशाच मानाई आणि इटलाई यादेखील रवळनाथाच्या ग्...

सहावी माळ : श्री धरणकरीण

Image
 सहावी माळ : श्री धरणकरीण नवरात्रीच्या सहाव्या माळेत आज जाणून घेऊया सडये-पिरंदवणे-वाडाजून या महालातील साती आसरा पैकी एक असलेल्या श्री धरणकरीण देवीविषयी... सडयेतून पिरंदवणेमार्गे थेट टोळवाडीतून मयुरेश्वराच्या मंदिरापुढे असणार्‍या घनदाट रस्त्याने अवघी पाच मिनीटे गेल्यावर नदीच्या निसर्गरम्य जलाशयात श्री धरणकरीण ही देवता वसली आहे. हे ठिकाण इतके निसर्गरम्य आहे की, या क्षेत्राचा पर्यटन-तीर्थक्षेत्रदृष्ट्या विकास झाला, तर ते एक सुरेख असे ‘क’ वर्गातील पर्यटनस्थळ निर्माण होईल. घनदाट जंगल आहे, मोठमोठाल्या पाषाणातून पाण्याचा स्त्रोत वाहत आहे, त्याचा खाली निचरा होत आहे, आणि याच पाषाणाच्या, आणि जलाशयाच्या एका कडेला श्री धरणकरीण देवीचे छोटेखानी, टुमदार मंदिर आहे. पुढे एक छोटेखानी पुलही आहे, ज्यावरून वाहने जातात, आणि त्या पुलावरून खालील दृश्य फार सुंदर दिसते. पावसाळ्यातील या परिसराचे वातावरण खूपच रम्य असे असते. या देवीचे नाव धरणकरीण, वस्तूत: तेथे प्राचीन बांधलेले धरण नाही. नदीच्या उतरंडीतून मोठमोठाल्या पाषाणांचे अडथळे पार करत पाणी खाली कोसळते, ते पुन्हा पाषाणांमुळे अडते आणि साचते. हेच निसर्गनिर्म...

वाडाजूनच्या सड्यावर 30 कातळशिल्पांचा खजिना!

Image
दिवाळीदिवशी वाडाजूनच्या सड्यावर शोधला 30 कातळशिल्पांचा खजिना! सडयेच्या तरूणांनी शोधली मानवासह रेड्यांची मोठाली पावलं, गुढ चाव्या, प्राणी आणि मडके सहभागी तरूण आणि तरूणी.   रत्नागिरी : नरकचतुर्दशी म्हणजे पहाटेचे अभ्यंगस्नान, दिवाळी फराळ आणि फटाक्याची आतषबाजी.. हा सारा नेहमीचा रिवाज टाळत सडयेतील तरूणांनी सलग तिसर्‍या वर्षी नरकचतुर्दशी दिवशी कातळशिल्प शोधयात्रा काढली. या शोधयात्रेतून सडये-वाडाजूनच्या सड्यावर थोडाथोडका नव्हे, तर तब्बल तीसेक ठाशीव, सुस्पष्ठ कातळशिल्पांचा समुह आढळून आला. छोटी, मध्यम आणि मोठाली अशी एकूण 10 रेड्यांची पावलं या ठिकाणी आढळून आली आहेत. 10 मानवाची पावलं आढळून आली आहेत, तर 2 मोठाल्या चाव्याकृती आकृत्या, 2 प्राणी, 1 मडके अशी 30 चित्रे प्रथमच आढळली आहेत. सडयेतील तरूण मंडळी दरवर्षी दिवाळीनिमित्त पदयात्रा काढत असतात. यावर्षीची पदयात्रा वाडाजून सड्यावरील ‘रेडेबावलं’ या गुढकथांनी  प्रसिध्द असलेल्या ठिकाणी गेली होती. बारा रेड्यांची जोतं आणि बारा माणसांच्या दुर्घटनेच्या कथित दुर्घटनेठिकाणी जावून या तरूणांनी सर्व अंधश्रध्दांना मुठमाती देण्याचा प्रयत्न या यात्रेनिमित्...

रावण चाले... धरतरी हाले...!

Image
  टाळ-मृदुंगाच्या साथीनं लयदार म्हण्णीत मंतरलेली रात्र संपून पहाट व्हायला आलेली... तरीही जागचं कुणी हललेलं नाही. बारीक पोरं मांडवात टाकलेल्या चटया, गोणपाटावर आडवी-तिडवी पडलेली.. रात्री जेवल्या-खावल्यानंतर ठाण मांडून बसलेल्या बाया-बापड्यांच्याही आता डोळ्यांवर झाक आलेली... तरीही कुणालाही उठावं, घरी जावं असं वाटत नाही.. इतक्यात अचानक ढोल-ताशे वाजू लागतात.. रंगमंचावरून ‘रावण चाले.. धरतरी हाले..’ अशी रणदुदुंभी गर्जू लागते. क्षणात भर मांडवात गोंधळ उठतो.  सारी बाया-बापडी ताशांच्या आवाजाने सावध होतात. आपल्या पोरां-बाळांना हलवून-डोलवून ‘‘आरं ए, उटा.. उटा.. रावन आला..!’’ अशी  हाकाटी मारतात, ...आणि ‘रावण आला..’ हा शब्द कानी पडताच, अख्खा मांडव ‘याजसाठी केला होता अट्टाहास...’ प्रमाणे दुसर्‍या क्षणाला जागा होतो. पटापटा सारी पोरं उठून बसतात... रावणाच्या वाटेचा वेध घेतात... प्रेक्षकांच्या खूप मागून कुठूनतरी ढोल-ताशे वाजत असतात. त्यांच्यासमोर आगीचे बोतेवाले, तलवारी फिरविणारे आणि जल्लोष करणारे खेळे असा शाही लंकापती रावण सीता स्वयंवरासाठी जनकराजाच्या दरबारात येत असतो.. लगेच बाया-बापडी रावण...