रत्नागिरीच्या हौशी रंगभूमीची कौतूकास्पद कलाकृती : 'मेला तो शेवटचा होता!'
रत्नागिरीच्या हौशी रंगभूमीची कौतूकास्पद कलाकृती : 'मेला तो शेवटचा होता!' (राज्य हौशी नाट्य स्पर्धा परिक्षण) रत्नागिरी : अमोल पालये. राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या प्रार्थमिक फेरीत रत्नागिरी केंद्रावर सोमवारी राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला. पहिल्याच दिवशी स्वामी पिता माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, कोळंबे-रत्नागिरी या संस्थेने 'मेला तो शेवटचा होता' हा नाटयप्रयोग सादर केला. विजय खानविलकर यांनी या नाटकाचे लेखन केले असून रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी दशरथ रांगणकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. 'मेला तो शेवटचा होता... ' ही कलाकृती भटक्या-विमुक्त समाजातील स्मशानजोगी या समुदायातील अन्यायग्रस्त, शोषित कुटुबाची ज्वलंत कहाणी उभी करते. गिरीजा(सावली पवार)- तुळाप्पा (अजित हातिस्कर) हे स्मशानजोगी दांम्पत्य आणि इंदर (सुरज पाटील) आणि आंशी (गौरी सावंत) ही त्यांची किशोरावस्थेतील मुले. तुळाची १७ वी पिढी स्मशानात परंपरेच्या नावाखाली खपतेय. वर्चस्ववादी वृत्तीचा सरपंच सुभानराव ( निलेश साळवी) गावावर प्रचंड दहशत बसवून आहे, त्यात तुळाप्पाचे कुटुंब अक्षरश: भरडले गेलेय. त्याची मुले शाळेतही...