सहावी माळ : श्री धरणकरीण
सहावी माळ : श्री धरणकरीण नवरात्रीच्या सहाव्या माळेत आज जाणून घेऊया सडये-पिरंदवणे-वाडाजून या महालातील साती आसरा पैकी एक असलेल्या श्री धरणकरीण देवीविषयी... सडयेतून पिरंदवणेमार्गे थेट टोळवाडीतून मयुरेश्वराच्या मंदिरापुढे असणार्या घनदाट रस्त्याने अवघी पाच मिनीटे गेल्यावर नदीच्या निसर्गरम्य जलाशयात श्री धरणकरीण ही देवता वसली आहे. हे ठिकाण इतके निसर्गरम्य आहे की, या क्षेत्राचा पर्यटन-तीर्थक्षेत्रदृष्ट्या विकास झाला, तर ते एक सुरेख असे ‘क’ वर्गातील पर्यटनस्थळ निर्माण होईल. घनदाट जंगल आहे, मोठमोठाल्या पाषाणातून पाण्याचा स्त्रोत वाहत आहे, त्याचा खाली निचरा होत आहे, आणि याच पाषाणाच्या, आणि जलाशयाच्या एका कडेला श्री धरणकरीण देवीचे छोटेखानी, टुमदार मंदिर आहे. पुढे एक छोटेखानी पुलही आहे, ज्यावरून वाहने जातात, आणि त्या पुलावरून खालील दृश्य फार सुंदर दिसते. पावसाळ्यातील या परिसराचे वातावरण खूपच रम्य असे असते. या देवीचे नाव धरणकरीण, वस्तूत: तेथे प्राचीन बांधलेले धरण नाही. नदीच्या उतरंडीतून मोठमोठाल्या पाषाणांचे अडथळे पार करत पाणी खाली कोसळते, ते पुन्हा पाषाणांमुळे अडते आणि साचते. हेच निसर्गनिर्म...