जय देवा साहित्याच्या म्हापुरूषां उबा र्हा..

जनसेवा ग्रंथालय, रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित आणि अमोल पालये यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणार्या साहित्यिक गुढीप्रसंगी घालण्यात येणार्या गार्हाण्याची पेशकश खास वाचकांसाठी.. जय देवा विवेकसिंधुकर्त्या मुकुंदराजा, महानुभावाच्या चक्रधरा, आळंदीच्या ज्ञानेश्वरा, वारकर्यांच्या नामदेवा, चोखा, बंका, गोरा, कान्होपात्रा, जयदेवा भानुदासा, जर्नादना, एकनाथा, रंगनाथा, विष्णुदासा, जय देवा देहुच्या तुकोबा, समर्था रामदासा, मुक्तेश्वरा, पंडिताच्या वामना, जय शिवकल्याणा, रमावल्लभदासा, गोसावी मोरया, मोरोपंता, श्रीधरा, रामजोशी, होनाजीबाळा, जय देशपांड्यांच्या पुरूषोत्तमा, तेंडुलकरांच्या विजया, अत्रेेंच्या प्रल्हादा, जय शिरवाडकर, दांडेकर, माडगुळकर आदी बारावेशीच्या बारागावाच्या बारा साहित्यपुरुषांनो उभे र्हावा.. होय म्हाराजा.. तसाच माय मराठीच्या मायमावल्यानों उबे र्हावा.. बाय अहिराणी, बाय कोंकणी, बाय कोल्हापूरी, बाय खानदेशी, बाय चंदगडी, बाय चित्पावनी, बाय देहवाली, बाय वारली, नागपुरी, बेलगावी, मालवणी, कुडाली, व्हराडी, संगमेश्वरी, ंभंडारी बोल्यांनुं तुमकां आज व्हया टिकानी हाका मारतंय, तं हाकेला...