सखुचं भूत

सखुचं भूत पाऊस विसावला होता, पण वारं काही थांबल्या थांबत नव्हतं. झाडं नुसती राक्षसी पिळवटत होती. वैतागवाडीच्या सार्वजनिक पार्याच्या खळ्यात तर पातेर्याचा नुसता खच झाला होता. चिखल, पाणी, वार्याने वातारवण चांगलंच गारठलं होतं. आधीच अमावास्या, त्यात पावसाच्या ढगांनी काळोख डोळ्यावर येत होता. चाकरमान्यांच्या राखणीला आलेले गावकरी घरी जाण्यासाठी पार्याच्या पडवीत बसून वारा विसावण्याची वाट पाहत होते. इतक्यात एखादी झुंड यावी तसाा वारा पार्याच्या पडवीत घुसला. त्यापाठोपाठ मोठ्याने काहीतरी पडल्याचा धडामधुम आवाज झाला. क्षणात पार्यासहित गावातले सगळे दिवे गेले, आणि आतापर्यंत शांत असलेल्या पार्यात एकच कालवा झाला. ‘‘पेटला..पेटला..पेटला.. सखुच्या डागंतला पिंपल पेटला..!’’ खालून कुणाचीतरी एकच किंचाळी ऐकायला आली. त्या किंचाळीने गावकर्यांच्या काळजात धस्सच झाले. पण मागोमाग आणखी दोघांतिघांचे स्पष्ठ आवाज आले. तसे सारे भानावर आले, आणि कापर्या अंगानं दूर टक लावून पाहू लागले. रामाने चाचपडत रॉकेलचा दिवा पेटवला. पार्याच्या खिडकीतून आत वाकून पाहिलं. सगळी सुनशान शांतता, आणि मिट्ट काळोख. आतमध्ये दहा-बारा चाकरमा...