सोहोनी पेेंटर..!
‘सोहोनी पेेंटर..!’ गे ल्याच आठवड्यात पेंटरांचा मेसेज आला होता. ‘अमोल अभिनंदन..’ माझ्या गावकी कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचं अनुदान मिळाल्याबद्दल त्यांनी केलेलं ते अभिनंदन होतं. त्यानंतर नाताळच्या आधी पेंटर नंदूकाका सोहोनींचे स्वामी समर्थ मुद्रेतील दर्शन दुकानाच्या बाजूला केलेल्या फळ्याआडून झाले होते. तेव्हा भेट घेणं टाळलं, त्याचं कारणही तसंच होतं. पेंटरांकडे जायचं म्हणजे खूप विषय असतात, आणि त्यासाठी कमीत कमी दोन तास तरी मोकळे हवेत. ते त्यावेळी माझ्याकडे नव्हते. मग बातमी आली, ‘पेंटर लोटलीकरांकडे आहेत..’ कळताच पाहून आलो. लांबुडका चेहरा.. पुर्ण टक्कल, मिश्किल, टपोरे कवठाएवढे डोळे, आणि ओठांवर स्मितहास्य.. बसलेले पेंटर टवकारून पाहत होते. नाकात श्वासनळ्या.. ‘दम लागतोय रे..’ इतकंच बोलले. ते इतकंच बोलणं कसतरीचं वाटलं. कारण, पेंटर म्हणजे ज्याला कला क्षेत्रातलं जाणून घ्यायची, ऐकायची इच्छा आहे, त्याला दोन तास तरी सोडत नसतच. त्यामुळे त्यांचे दोन शब्दात आवरते घेणे, पाहवले नाही. सोबत त्यांचा लाडका आण्णा होता. तो निघता निघता म्हणाला, ‘घाबरू नका.’ ..आणि अचानक त्यांच्यातला धीरोदात्तपणा, सद...