Posts

Showing posts from January, 2020

जय देवा साहित्याच्या म्हापुरूषां उबा र्‍हा..

Image
जनसेवा ग्रंथालय, रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित आणि अमोल पालये यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणार्‍या साहित्यिक गुढीप्रसंगी घालण्यात येणार्‍या गार्‍हाण्याची पेशकश खास वाचकांसाठी.. जय देवा विवेकसिंधुकर्त्या मुकुंदराजा, महानुभावाच्या चक्रधरा, आळंदीच्या ज्ञानेश्वरा, वारकर्‍यांच्या नामदेवा, चोखा, बंका, गोरा, कान्होपात्रा, जयदेवा भानुदासा, जर्नादना, एकनाथा, रंगनाथा, विष्णुदासा, जय देवा देहुच्या तुकोबा, समर्था रामदासा, मुक्तेश्वरा, पंडिताच्या वामना, जय शिवकल्याणा, रमावल्लभदासा, गोसावी मोरया, मोरोपंता, श्रीधरा, रामजोशी, होनाजीबाळा, जय देशपांड्यांच्या पुरूषोत्तमा, तेंडुलकरांच्या विजया, अत्रेेंच्या प्रल्हादा, जय शिरवाडकर, दांडेकर, माडगुळकर आदी बारावेशीच्या बारागावाच्या बारा साहित्यपुरुषांनो उभे र्‍हावा.. होय म्हाराजा.. तसाच माय मराठीच्या मायमावल्यानों उबे र्‍हावा.. बाय अहिराणी, बाय कोंकणी, बाय कोल्हापूरी, बाय खानदेशी, बाय चंदगडी, बाय चित्पावनी, बाय देहवाली, बाय वारली, नागपुरी, बेलगावी, मालवणी, कुडाली, व्हराडी, संगमेश्वरी, ंभंडारी बोल्यांनुं तुमकां आज व्हया टिकानी हाका मारतंय, तं हाकेला
द्विशतकपुर्तीतला ‘संगमेश्वरी बाज’! चार-पाच वर्षापूर्वीची गोष्ट असेल.. रत्नागिरी शहरात कोमसापचे साहित्य संमेलन भरले असता, तेथे एका कार्यक्रमात संगमेश्वरी बोलीचे अभ्यासक आनंद बोंद्रे गुरूजींनी ‘सध्या मी एक संगमेश्वरी बोलीतले नाटक लिहत असून लवकरच ते तुमच्या भेटीला येईल, आणि ते जोरदार धुमशान घालील..!’ असा प्रचंड आत्मविश्वास व्यक्त केला होता. सध्याच्या नाटकांची परिस्थिती पाहता बोंद्रे गुरूजींच्या त्या आत्मविश्वासावर मला अविश्वास व्यक्त करणारे हसू आले, पण वर्षभरातच बोंद्रे गुरूजींच्या एकपात्री कार्यक्रमावर आधारित नाटक रंगमंचावर बागडू लागले. गेल्या तीन वर्षात या नाटकाचं बागडणं हे निव्वळ शहरातच नव्हे, रत्नागिरीच्या झापाच्या थेटरातही गुरूजींनी म्हटल्याप्रमाणे धुमशान घालत राहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या ‘त्या’ आत्मविश्वासात काय ताकद भरलेली असावी, हे आज ‘कोकणचा साज.. संगमेश्वरी बाज..’ चे दोनशेपार प्रयोग पाहिले की दिसून येते. अशा या ‘कोकणचा साज.. संगमेश्वरी बाज..’चा द्विशतकपुर्ती सोहळा साजरा होत आहेे, त्यानिमित्त कित्येकवेळा पाहिलेल्या संगमेश्वरी साजचे हे ‘रसग्रहण’.. आजपर्यंत ‘संगमेश्वरी साज’ क