Posts

Showing posts from March, 2024

वाडाजूनच्या सड्यावर 30 कातळशिल्पांचा खजिना!

Image
दिवाळीदिवशी वाडाजूनच्या सड्यावर शोधला 30 कातळशिल्पांचा खजिना! सडयेच्या तरूणांनी शोधली मानवासह रेड्यांची मोठाली पावलं, गुढ चाव्या, प्राणी आणि मडके सहभागी तरूण आणि तरूणी.   रत्नागिरी : नरकचतुर्दशी म्हणजे पहाटेचे अभ्यंगस्नान, दिवाळी फराळ आणि फटाक्याची आतषबाजी.. हा सारा नेहमीचा रिवाज टाळत सडयेतील तरूणांनी सलग तिसर्‍या वर्षी नरकचतुर्दशी दिवशी कातळशिल्प शोधयात्रा काढली. या शोधयात्रेतून सडये-वाडाजूनच्या सड्यावर थोडाथोडका नव्हे, तर तब्बल तीसेक ठाशीव, सुस्पष्ठ कातळशिल्पांचा समुह आढळून आला. छोटी, मध्यम आणि मोठाली अशी एकूण 10 रेड्यांची पावलं या ठिकाणी आढळून आली आहेत. 10 मानवाची पावलं आढळून आली आहेत, तर 2 मोठाल्या चाव्याकृती आकृत्या, 2 प्राणी, 1 मडके अशी 30 चित्रे प्रथमच आढळली आहेत. सडयेतील तरूण मंडळी दरवर्षी दिवाळीनिमित्त पदयात्रा काढत असतात. यावर्षीची पदयात्रा वाडाजून सड्यावरील ‘रेडेबावलं’ या गुढकथांनी  प्रसिध्द असलेल्या ठिकाणी गेली होती. बारा रेड्यांची जोतं आणि बारा माणसांच्या दुर्घटनेच्या कथित दुर्घटनेठिकाणी जावून या तरूणांनी सर्व अंधश्रध्दांना मुठमाती देण्याचा प्रयत्न या यात्रेनिमित्त केला. य

रावण चाले... धरतरी हाले...!

Image
  टाळ-मृदुंगाच्या साथीनं लयदार म्हण्णीत मंतरलेली रात्र संपून पहाट व्हायला आलेली... तरीही जागचं कुणी हललेलं नाही. बारीक पोरं मांडवात टाकलेल्या चटया, गोणपाटावर आडवी-तिडवी पडलेली.. रात्री जेवल्या-खावल्यानंतर ठाण मांडून बसलेल्या बाया-बापड्यांच्याही आता डोळ्यांवर झाक आलेली... तरीही कुणालाही उठावं, घरी जावं असं वाटत नाही.. इतक्यात अचानक ढोल-ताशे वाजू लागतात.. रंगमंचावरून ‘रावण चाले.. धरतरी हाले..’ अशी रणदुदुंभी गर्जू लागते. क्षणात भर मांडवात गोंधळ उठतो.  सारी बाया-बापडी ताशांच्या आवाजाने सावध होतात. आपल्या पोरां-बाळांना हलवून-डोलवून ‘‘आरं ए, उटा.. उटा.. रावन आला..!’’ अशी  हाकाटी मारतात, ...आणि ‘रावण आला..’ हा शब्द कानी पडताच, अख्खा मांडव ‘याजसाठी केला होता अट्टाहास...’ प्रमाणे दुसर्‍या क्षणाला जागा होतो. पटापटा सारी पोरं उठून बसतात... रावणाच्या वाटेचा वेध घेतात... प्रेक्षकांच्या खूप मागून कुठूनतरी ढोल-ताशे वाजत असतात. त्यांच्यासमोर आगीचे बोतेवाले, तलवारी फिरविणारे आणि जल्लोष करणारे खेळे असा शाही लंकापती रावण सीता स्वयंवरासाठी जनकराजाच्या दरबारात येत असतो.. लगेच बाया-बापडी रावणाच्या वाटेतली