श्री सुंकाई मंदिर कलशारोहण सोहळा

श्री सुंकाई मंदिर कलशारोहण सोहळा रत्नागिरी तालुक्यातील सडये-पिरंदवणे-वाडाजूनचे ग्रामदैवत श्री सुंकाई देवस्थानचा मंदिर कलशारोहण सोहळा थाटात पार पडला. यानिमित्ताने काढण्यात आलेली कलश मिरवणूक तिन्ही वाड्यांच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी ठरली. लहानापासून आबालवृध्दांपर्यंत मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाले होते. सडये-पिरंदवणे-वाडाजून गावांचे ग्रामदैवत म्हणून ख्याती असलेल्या श्री सुंकाई मंदिराची देखणी वास्तू ग्रामस्थ, भाविक, दानशूरांच्या देणगीतून उभारण्यात आली आहे. या मंदिराचा शनिवार दि.18 रोजी कलशारोहण सोहळा पार पडला. तत्पुर्वी मंदिराच्या कलशाची भव्त मिरवणूक सडये गावातून काढण्यात आली. तिन्ही वाड्यांची ढोलपथक, लेझीमपथक, यासंह सडयेतील तरुण, तरुणींनी तिन्ही वाड्यांच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविले. यात लहान मुलांनी गणपतीचे कुटुंब ही संकल्पना साकारली होती. तर जयश्री कुर्टे यांनी झाशीची राणी साकारुन इतिहास जागा केला. अंजली धुमक, सुशिल धुमक, स्वरित धुमक यांच्या छत्रपती शिवराय-जिजाऊ दर्शनाने सार्या शोभायात्रेत विरश्री संचारली होती. अमोल पालये यांनी आणलेल्य...