Posts

बारा नमनाची म्हणणी

Image
बारा नमनाची म्हणणी (ओळख नमन/खेळ्यांची) कोकणची लोककला म्हणून ओळख असलेल्या नमन-खेळ्यांची सुरूवात ही बारा/सोळा नमनाने होत असते. देवतांना या नमनातून वंदन केले जाते. ही वंदनं प्रत्येक गावानुसार वेगवेगळी असतात. मात्र पहिले नमन हे धरती मातेलाच असते, आणि दहावे नमन हे दशमुखी रावणाला असते. हे एक यात साम्य आढळून येते. यामध्ये पहिले नमन धरती मातेला असण्यामागे ठोस कारण आहे. नमन/खेळे ही प्रामुख्याने कोकणातील कुणबी समाजाने जोपासलेली लोककला. कुणबी समाज हा शेतकरी असल्याने त्याचे नाते धरणी मातेशी जवळचे आहे. साहजिकच नमनामध्ये पहिले नमन हे धरणी मातेलाच असते. दुसरी गोष्ट रावणाला नमन करण्याची.. रावण दुष्ट..रावण खलनायक.. रावणाने सीतेला पळविली.. ही रावणाची नकारात्मक बाजू असूनही रावणाला नमनात बारा नमनात स्थान मिळाले आहे, अनेकांना हे कोडे वाटते, आणि नव्या पिढीला खटकणारे वाटते. मात्र याबाबत नमन/खेळ्यातील बुजूर्ग रंगकर्मी जे सांगतात, ते विचार करायला लावणारे आहे.  सुंकाई नमन मंडळ, सडये या मंडळाचे रंगकर्मी कै.पु.ल.माने यांनी सांगितले की, इतिहास हा नेहमी विजयी होणार्‍याच्याच बाजूने लिहला जातो. रावण परा...

जय देवा साहित्याच्या म्हापुरूषां उबा र्‍हा..

Image
जनसेवा ग्रंथालय, रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित आणि अमोल पालये यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणार्‍या साहित्यिक गुढीप्रसंगी घालण्यात येणार्‍या गार्‍हाण्याची पेशकश खास वाचकांसाठी.. जय देवा विवेकसिंधुकर्त्या मुकुंदराजा, महानुभावाच्या चक्रधरा, आळंदीच्या ज्ञानेश्वरा, वारकर्‍यांच्या नामदेवा, चोखा, बंका, गोरा, कान्होपात्रा, जयदेवा भानुदासा, जर्नादना, एकनाथा, रंगनाथा, विष्णुदासा, जय देवा देहुच्या तुकोबा, समर्था रामदासा, मुक्तेश्वरा, पंडिताच्या वामना, जय शिवकल्याणा, रमावल्लभदासा, गोसावी मोरया, मोरोपंता, श्रीधरा, रामजोशी, होनाजीबाळा, जय देशपांड्यांच्या पुरूषोत्तमा, तेंडुलकरांच्या विजया, अत्रेेंच्या प्रल्हादा, जय शिरवाडकर, दांडेकर, माडगुळकर आदी बारावेशीच्या बारागावाच्या बारा साहित्यपुरुषांनो उभे र्‍हावा.. होय म्हाराजा.. तसाच माय मराठीच्या मायमावल्यानों उबे र्‍हावा.. बाय अहिराणी, बाय कोंकणी, बाय कोल्हापूरी, बाय खानदेशी, बाय चंदगडी, बाय चित्पावनी, बाय देहवाली, बाय वारली, नागपुरी, बेलगावी, मालवणी, कुडाली, व्हराडी, संगमेश्वरी, ंभंडारी बोल्यांनुं तुमकां आज व्हया टिकानी हाका मारतंय, तं हाकेला...
द्विशतकपुर्तीतला ‘संगमेश्वरी बाज’! चार-पाच वर्षापूर्वीची गोष्ट असेल.. रत्नागिरी शहरात कोमसापचे साहित्य संमेलन भरले असता, तेथे एका कार्यक्रमात संगमेश्वरी बोलीचे अभ्यासक आनंद बोंद्रे गुरूजींनी ‘सध्या मी एक संगमेश्वरी बोलीतले नाटक लिहत असून लवकरच ते तुमच्या भेटीला येईल, आणि ते जोरदार धुमशान घालील..!’ असा प्रचंड आत्मविश्वास व्यक्त केला होता. सध्याच्या नाटकांची परिस्थिती पाहता बोंद्रे गुरूजींच्या त्या आत्मविश्वासावर मला अविश्वास व्यक्त करणारे हसू आले, पण वर्षभरातच बोंद्रे गुरूजींच्या एकपात्री कार्यक्रमावर आधारित नाटक रंगमंचावर बागडू लागले. गेल्या तीन वर्षात या नाटकाचं बागडणं हे निव्वळ शहरातच नव्हे, रत्नागिरीच्या झापाच्या थेटरातही गुरूजींनी म्हटल्याप्रमाणे धुमशान घालत राहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या ‘त्या’ आत्मविश्वासात काय ताकद भरलेली असावी, हे आज ‘कोकणचा साज.. संगमेश्वरी बाज..’ चे दोनशेपार प्रयोग पाहिले की दिसून येते. अशा या ‘कोकणचा साज.. संगमेश्वरी बाज..’चा द्विशतकपुर्ती सोहळा साजरा होत आहेे, त्यानिमित्त कित्येकवेळा पाहिलेल्या संगमेश्वरी साजचे हे ‘रसग्रहण’.. आजपर्यंत ‘संगमेश्वरी साज’ क...

गांगोबा-भराडीन-आदिष्टीच्या सानेवरून..

मु.भावेआडम हे रत्नागिरी तालुक्यातील तसं कुठे लेखी नसलेलं गाव माझं दुहेरी आजोळ आहे. गोरिवले आणि घवाळी अशी दुहेरी भावकी माझी आजोळ घरं आहे. याशिवाय इतरही बरीच नातीगोती याच गावात आहे. ती अशी एकत्र असल्याने एकाचवेळी भेटू शकतात, म्हणून जायलाही आवडतं. शिमगोत्सव हा या गावाचा लोकोत्सव. पार्वती घवाळीणीच्या कडेवर बसून मी इथला शिमगोत्सव पाहत आलो आहे. तो पाहण्याचं भाग्य आनंदाचं. दोन वर्षापूर्वी आडमच्या शिमग्याला गेलो होतो. त्यानंतर जाणे झाले नाही. यंदा योग जुळून आला आणि गांगोच्या चरणी माथा टेकला. पौर्णिमेला गांगोबा-आदिष्टीचा शिमगा सानेवर साजरा झाला. शिमगा संपला.. मी आलो, पण मन मात्र आदिष्टीच्या निर्जन सानेवर ठेवून आलोय. झरझरणारी वार्‍याची झुळुक अजूनही त्या मनाला घरी आणावीशी वाटत नाही.. यंदाच्या शिमग्यात इथं एक आधुनिक बदल दिसला. चाकरमान्यांचा ओढा या शिमग्यात मोठा असतो. यावर्षीही तो नटून-थटून आला होता. मात्र यावेळी बहुतेकसा चाकरमानी आपल्या दुचाकीवर बसून आला होता. सानेवर खूप गाड्या लागलेल्या. मी चालणारा माणूस. मला दगड-धोंड्यातून चालायला आवडतं. पण मामा म्हणाला, गाडीवरून जाऊ. आदिष्टीच्या कातळावरच्या द...
सडये-पिरंदवणे-वाडाजून:  एक संस्कृती दर्शन उशाला ‘सडा’, पायथ्याला ‘मोडा’ मधी गाव वसलंय न्यारं.. स्वागत कमान, हिरवं रानं स्थळ ते ‘तांबड-पीर’.. उसळे पाणी, गर्द रानी रोखून धरी वारं.. ‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ.. ‘सडये’ गावाच्या सीमेवर..॥धृ॥ पळपळ कुरली, सळसळ बोयरं गरजे ‘कांदळतीर’.. ‘मळ्याची शेती’, ‘पुळणीची माती’ शेत पिकतंय भरपूर.. ‘आडाचं पाणी’, ‘खेळ्यांची गाणी’ गाती गोड गळा शाहीर.. ‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ.. ‘सडये’ गावाच्या सीमेवर..॥1॥  येई‘रवळनाथ’, पडते ‘थाप’ स्वारी फिरे घरोघर.. ‘सोमेश्वरी’ सत्ता, ‘सुंकाई’ माता कृपा ठेवी गावावर.. साठ्यांची ‘जोगेश्वरी’, देखण्या मंदिरी होई शक्तीचा जागर.. ‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ.. ‘सडये’ गावाच्या सीमेवर..॥2॥ आई ‘भराडीण’, गावाची रखवालीन जाखमाता क्षेत्रावर.. देवस्थानी आसन, करती पुजन नांदे ‘धुमकांचा’ वठार.. गणपती पुजता, चाकरमानी येती गर्जे भजनांचा ‘सुस्वर’.. ‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ.. ‘सडये गावाच्या सीमेवर...॥3॥ उंच डोंगरी, मुर्ती साजिरी ‘टोळवाडी’ वसे ‘मोरेेश्वर’.. क्षणभर बसता, प...

नाटकात काम करतानाच इच्छा मृत्यू येणारे नटवर्य ‘शंकर घाणेकर’ (shankar ghanekar)

Image
सडये-पिरंदवणेचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे विनोदवीर म्हणून ख्याती पावलेल्या नटवर्य कै.शंकर घाणेकर यांचा तारखेनुसार दि.20 मार्च व तिथीनुसार तुकाराम बीज हा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने जागविलेल्या या शंकरस्मृती... ख रा नाट्यकर्मी आपल्या आयुष्यात दोन इच्छा बाळगतो, एक त्याला कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ नाटकात आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारायला मिळावी, आणि दुसरी इच्छा आपल्याला मरण हे नटेश्वराच्या दरबारात नाटकात काम करता करता रंगभूमीवर यावे.. यातील पहिली इच्छा सर्वस्वी नटावरच अवलंबून असली, तरी दुसरी इच्छा मात्र नटेश्वरावरच अवलंबून आहे. रत्नागिरीचे सुपुत्र नटवर्य शंकर घाणेकरांना असेच रंगभूमीवर भाग्यशाली मरण आले, अशा या नटरंगी रंगलेल्या नटवर्याची ही कहाणी.. कोकणात नाटकवेड ओतप्रोत भरलेलं आहे. अजूनही कोकणातल्या खेड्यापाड्यात झापातल्या  थेटरातली नाटकं मोठ्या हौशीनं हौशी कलाकार सादर करतात. याच हौशी रंगभूमीतून शंकर घाणेकर उदयाला आले, अन् मराठी रंगभूमीचे ‘नटवर्य’ झाले. रत्नागिरी तालुक्यातील सडये-पिरंदवणे हे शंकर घाणेकरांचे जन्मगाव. रत्नागिरी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर गणपतीपुळया...

जाग

Image
प्र कल्पाच्या भूसंपादनाचा पहिलाच दिवस होता. श्रीपतला सुट्टी होती. रोज गुरं घेऊन जाणार्‍या बापाला आज बर्‍याच दिवसानंतर श्रीपतने सांगितलं, ‘‘म्हातार्‍या आज शेतावर तू नको जाव. माझी सुट्टी हाय, मी चाललंय...’’ बापाला जरा बरं वाटलं. खरेतर गुरे घेवून जायची त्याला इच्छाच नव्हती; पण ‘म्हातार्‍याला जर कळलं आज  जम्मनीची मापणी हाय तर म्हातारा  गोंधळ घालील. त्यात सारे गावकरी अक्षरश: संतापलेले. काहीतरी कंदाल होण्यापेक्षा आपणच शेतावर गेलेले बरे...’ या विचारानं श्रीपत शेतावर गेला. गावात वातावरण तापलेलं, आदल्या रात्री सार्‍या गावाची गावकी मध्यरात्रीपर्यंत चालू होती. गावकीत जोराची सनसनी झाली. उभ्या गावकीत प्रकल्पावरून आडवी फुट पडली. अर्धे गावकरी प्रकल्प नको म्हणून पेटून उठले होते, तर काही प्रकल्प हवा म्हणून पुटपुटत होते. त्यावरून वादावादीही झाली. जमिनी जाणार म्हणून ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याइतपत वेळ आली. त्यामुळे आज नक्कीच काहीतरी कंदाल होणार याची श्रीपतला कल्पना आलीच होती. अगदी तस्संच झालं. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तब्बल सात-आठ गाड्या सारं रान तुडवीत गावठाणात घुसल्या... गावठाणात हा हा ...

शेतकर्‍याचा पोर

Image
तां ब्यांच्या खालच्या वाडीत गावकर्‍यांची लगबग चालू होती. धर्मी तांबीनीकडे तर जेवायलाही पुरसत नव्हती. तीच्या उत्साहाला जणू उधाणच आलं होतं. वाडीचा सोना गावकार, तांब्यांची भावकी, गावाची गावकी अशा पुर्‍या वाडीला काल संध्याकाळीच आमंत्रण देवून झालं होतं. म्हातारी गौतमीच्या तंगड्यात ताकद नव्हती तरीसुध्दा ती विड्याचं सामान, नारळ-सुपारी अशा विधीच्या सामानाच्या गठड्या बांधण्यात गुुंतली होती. घरात नातसून येणार या कल्पनेने ती हरखूनच गेली होती. गौतमीच्या नातवाचं, धर्मीच्या लेकाचं आणि प्रगतीशिल युवा शेतकरी गुरु तांबेचं लग्न अखेर ठरलं होतं. जाधव मास्तरांचा काल सकाळी ‘पोरगी बघायला या...’ असा निरोप आला आणि दोघींच्याही डोक्यावरचं मणमणाचं ओझं हलकं झाल्यासारखं दोघींना वाटलं.  धर्मी निरोप आल्याआल्या पुरुष्या भटाकडे गेली. पोरगी बघण्यासाठी मुहूर्त मागितला, भटानं आजचीच गोरज मुहूर्ताची वेळ दिली. लगेच मुहूर्त मिळाल्याने धर्मीही खुश झाली. गावातल्या पोरांकरवी गावात धडाधड आमंत्रणं फिरली.. मानाची-पानाची जी ठिकाणं होती तिथं धर्मी स्वत: गेली. सकाळी सकाळी धर्मीनं गुरुला पेढे आणि खण आणायला बाजारात पाठविलं होतं,...

विडे ठेवण्याची परंपरा:एक चिंतन!

Image
विडे ठेवण्याची परंपरा: एक चिंतन! कोकणातल्या शेतकर्‍यांच्या घरात देव दिवाळीला विडे भरण्याची परंपरा आहे. काय आहे ही परंपरा..? याचं हे मनोवेधक चिंतन.. कोकणातल्या (विशेषत: रत्नागिरीतल्या) शेतकर्‍यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. नरक चतुर्दर्शीला रत्नागिरीतला शेतकरी भाताच्या कापणीत गुंतलेला असतो. तर देवदिवाळीला त्याच्या घरात धान्य लक्ष्मीचे आगमन झालेले असते. अर्थात तो समृध्द बनलेला असतो, त्यामुळे देवदिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता, लोकोत्सव असतो. गावागावातल्या देवादिकांच्या जत्राही याचमुळे केवळ देवदिवाळीपासूनच सुरू होतात. नरक चतुर्दर्शीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. देवदिवाळीलाही ती आहे. मात्र देवदिवाळीच्या अभ्यंगस्नानाचा पहिला मान गोठ्यातल्या बैलाचा.. गायीचा! आधी त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालायची, त्यांना तेल लावायचं. गोठा सारवायचा. तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढायच्या. गोठ्यात दिवे लावायचे. दिव्याने गुरांना ओवाळायचं. मग गुरांना आंबोळ्या खायला घालायच्या..! स्वत: आधी दुसर्‍याचा विचार..जगाचा विचार.. विशेषत: आपल्या गुरा-ढोरांचा विचार शेतकर्‍यांशिवाय या जगात को...

काजवा

(लघु पर्यावरणकथा) त्या अंधार्‍या घरात फक्त ते दोघेच रहायचे. एक तो निर्धन कवी, तर दुसरा स्वयंप्रकाशी काजवा. भयाण अंधारात जेव्हा कवीला घर खायला उठायचं, तेव्हा हाच काजवा आपल्या लुकलुकत्या तेजानं कवीचं मन रिझवायचा. मग कवीही त्याच्यावर सुरेख सुरेख कविता लिहायचा. राजाच्या भाटाप्रमाणे त्याची स्तुती गायचा.. दोघांची रिलेशनशिप मस्त जमली होती, पण कविच्या सुरेख सुरेख स्तुती कवितांनी काजव्याच्या डोक्यात हवा शिरू लागली. आणि तेथेच त्यांच्या अनोख्या रिलेशनशिपला सुरुंग लागला. काजवा उन्मत होऊ लागला. कवीला म्हणून लागला, ‘अरे कवड्या, किती हा तुझ्या घरात अंधार..? मी आहे म्हणून उजेड तरी पडतो! जर मी दुसरीकडे गेलो, तर कुठेतरी अंधारात चाचपडत आपटशील, आणि मरशील हो..’ कवी जोराने हसला. बोलला काहीच नाही. .. आणि एकेदिवशी कवीची चेष्ठा करून तो काजवा त्या अंधार्‍या घरातून बाहेर गेला. आता एका श्रीमंताच्या बंगल्यात शिरावं, आणि तिथल्या माणसाचं मन रिझवावं.. असा विचार करत तो एका अलिशान बंगल्यात शिरला. संध्याकाळची वेळ होती. काजवा मनातच म्हणत होता, ‘आता या बंगल्याला बघ, कसा झळाळून टाकतो!’ काजवा बंगल्यात शिरला तेव्ह...

भुताची शिकार

Image
नव्वदच्या दशकाआधी कोकणातल्या वाड्या-वाड्यात, झाडा-पेडावर बर्‍याच संख्येनं भुता-खोतांचं राज्य होतं. गावची सीमा, गावचा सडा, गावची पांदळ, गावातली झाडून सगळी वडाची झाडं, पिंपळ, वाघबिळं, देवाधर्माची-भूतम्हारक्याची ठिकाणं, स्मशानं, चिंचेंची झाडं अगदी गावच्या कोपर्‍या कोपर्‍यानं गावागावातून भुतं सुखासमाधानानं नांदत होती. टिव्ही, मोबाईल फारसा नसलेल्या त्या काळात भुतांच्या गप्पा अतिशय चवीनं रंगत. कधी शाळेतल्या वर्गात.. कधी शेताच्या बांधावर.. कधी रात्रीच्या जेवणानंतर.. गप्पा जशा रंगत तशा त्या अधिक भयावह होत जात. त्यातही गंमत म्हणजे कालच्या रात्रीतल्या गोष्टीत भूत पांढर्‍या साडीतलं असेल तर लगेच दुसर्‍या रात्री त्याच गोष्टीत त्याच भुताला उलटे पाय फुटलेले असायचे..!  नव्वदच्या दशकानंतर कोकणातली भूतं फारच कमी होऊ लागली आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे भीती कमी होऊ लागली. ही भीती कमी होण्यासाठी गाववाड्यातून बरेच बदल व्हावे लागले. पुर्वी गावात भुतांचे वसतीस्थान असणारे वटवृक्ष वृक्षतोडीमुळे संपले. गावात तेव्हा वीजही नव्हती. अख्खी रात्र रॉकेलच्या दिव्यावर घालवावी लागे. आता मात्र घराघरातून दिवे लागल...