Posts

भराडणीची अरण्ययात्रा!

Image
भराडणीची अरण्ययात्रा! श्री क्षेत्र भराडणी रत्नागिरीची ‘कातळशिल्प’ गेल्या काही वर्षात खूप चर्चेत आली आहेत. सरकार माध्यमातून त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्नही चालू झाले आहेत. माझी जन्मभूमी सडये-पिरंदवणेच्या सड्यावर-कातळावरही मुबलक कातळशिल्पे आहेत, त्यामुळे ‘कातळशिल्प’ हा विषय माझ्यादृष्ट्रीने कुतूहलाचा ठरला होता. गेेले कित्येक वर्षे त्यांचा शोध घेण्याचे आढावे आमच्या ‘रात्रीच्या बैठकीत’ ठरत होते, पण घडत काही नव्हते.  यंदाच्या नवरात्रीत मी सडये-पिरंदवणे परिसरातील मातृदेवतांचा शोध घेणारी लेखमालिका ब्लॉगवर सुरू केली. ती खूप जणांना आवडली होती. त्यातील काही मातृदेवता मी पाहिल्या होत्या. काही ऐकीव माहितीच्या होत्या. त्याही पहायच्या होत्या, पण घडत नव्हते. नवरात्रीदरम्यानच्या ‘रात्रीच्या बैठकीत’ हा मुद्दा ऐरणीवर आला. बैठकीचे मेंबर आण्णा धुमक, बाळआण्णा धुमक, आप्पा धुमक, गुरू धुमक, मारूती धुमक, मी, चंपूआत्ते.. आणि इतर सारेच बोलू लागले, आणि ठरले.  जांगलदेव सारा कातळ धुंडाळायचा म्हणजे त्याला चांगला मार्गदर्शक हवा. आप्पा धुमक त्यासाठी विनाअट तयार झाले, त्यांचा तो नित्याचा मार्ग होता. कोरोनाचा ...

संकासूर (sankasur)

Image
संकासूर समस्त कोकणवासिय आणि चाकरमानी यांच्या जगण्याचे टॉनिक म्हणजे शिमगोत्सव! बारावाड्यांच्या गावदेवाला फुल लागलं, रुपं चढलं की कोकणात पालख्यांचे ढोल वाजू लागतात. गावभोवनीच्या देवांबरोबर गावभोवनीचे खेळे सजतात आणि घरोघरी फिरू लागतात. असा हा कोकणातला शिमगोत्सव अनेकप्रकारे वैशिष्ठपूर्ण आहे. त्यातील एक वैशिष्ठ म्हणजे, हिंदू धर्मात भक्ताने देवालयात जावे, आणि देवाचे दर्शन घ्यावे, असा नियम आहे. कोकणातला शिमगोत्सव मात्र हा नियम दूर ठेवतो. येथे चक्क ग्रामदेव भक्ताघरी उंबरठा ओलांडून घरात येतात. येतात ते येतात, ढोल-ताशांचा शाही गोतावळा घेऊन येतात. दुसरं वैशिष्ठ म्हणजे, पालखीतले देव पौराणिक नाहीत. ब्रम्हा, विष्णू, महेश, राम-लक्ष्मण, कृष्ण असे प्रस्थापित देव नाहीत. पालखीतून गावभेटीला निघणारे देव हे पुराणाबाहेरचे आहेत. त्यांच्याकाही अवतार लिलाही माहित नाहीत, तरीही गेली हजारो वर्षे त्यांनी कोणतंही स्वत:च मार्केटिंग नसताना कोकणवासियांच्या मनावर गारूड केलं आहे. तिसरं विशेष म्हणजे, कोकणातल्या पालख्या पाहिल्या तर त्यात कमीत कमी तीन, जास्तीत जास्त पाच-सहा देव असतात. यातही सर्वाधिक असतात त्या स्त्री देवता....

मी हिजडा.. मी लक्ष्मी

Image
  मी हिजडा.. मी लक्ष्मी - लेखक: लक्ष्मी नारायण त्रिपाठी. (पुस्तक परिचय) पत्रकारितेच्या सुरूवातीला एका वृत्तपत्रातील मुलाखतीने माझे लक्ष वेधले होते. साधारण 2010 सालची गोष्ट असेल.. ती मुलाखत एका वेगळ्या व्यक्तिीची होती. छायाचित्रांमुळे ती मुलाखत चांगली सजली होती. ठाण्यातील पत्रकार अशोक गावकर यांनी त्या मुलाखतीतून त्या व्यक्तिचं म्हण्णं मांडण्यासाठी तीला पुरेपूर जागा दिली होती. दोन-तीनवेळा तरी ती मुलाखत मी वाचली. त्या व्यक्तिचं त्या मुलाखतीमुळे माझ्यावर गारुड निर्माण झालं. त्यानंतर काही दिवसातच त्या व्यक्तिची जन्मकथा.. व्यथा मांडणारी लघुकथा मी लिहली. ती माझी प्रकाशित न झालेली पहिली लघुकथा. ‘धु्रव’ तीचं नाव. पण अखेरपर्यंत ती कथा कधीच मार्गा लागली नाही. कारण, त्या व्यक्तिला पुरेपूर जाणून घेणं, माझ्यासारख्याला शक्य नव्हतं. मुळात मी तेव्हा लिहतच नव्हतो.. ती मुलाखत आणि माझी पहिली कथा जिच्यामुळे लिहली गेली, ती असामी म्हणजेच ‘मी हिजडा.. मी लक्ष्मी’ या पुस्तकाची लेखिका आणि तृतीयपंथी- लक्ष्मी नारायण त्रिपाठी. आयबीएन लोकमतवर जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी लोकप्रिय गे्रट-भेट कार्यक्रमातही तीची ...

नववी माळ: श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई

Image
नववी माळ: श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई नवरात्रीच्या शेवटच्या नवव्या माळेत एकत्रितपणे आणि एकरूप असलेल्या तीन बहिणी- श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. या तिन्ही देवता केळये ग्रामी वसल्या आहेत. मात्र सडये-पिरंदवणेसह समस्त बारा वाडेकरांचा त्यांचीशी असलेला श्रध्दाभाव हा शब्दांपलिकडला आहे. या देवतांची ग्रामप्रदक्षिणा बंद झाल्यानंतरही हा श्रध्दाभाव कमी झाला नाही, यावरून जनमानसावरील ‘मातृदेवतांचे गारूड’ लक्षात येईल. रत्नागिरी जिल्ह्यात नवलाई, पावणाई, वाघजाईची अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. त्यामुळे या तिन्ही देवता सर्वांनाच परिचित आहेत. विशेष म्हणजे केळये गावातील या तिन्ही ग्रामदेवता भूमका स्वरूपातील आहेत, हे त्यांचे प्राचीनत्व अधोरेखित करते. जरी त्या भूमका असल्या तरी त्यांची पालखीतील रूपे ही अतिशय विलोभनीय आहेत. केळये ग्रामी या देवतांची एकाच ठिकाणी मंदिर नाहीत, तर ती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. सडये-पिरंदवणे गावाची श्री देवी भराडणीपासून सीमा ओलांडली की या तिन्ही देवतांचे कार्यक्षेत्र सुरू होते. अर्थात पलिकडच्या भागात केळये गाव लागते. या तिन्ही देवता आक्रमक...

आठवी माळ: श्री धरणकरीण

Image
आठवी माळ: श्री धरणकरीण धरणकरणीचे  स्थान सडये-पिरंदवणे क्षेत्रातील अंत्यत निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री धरणकरणीला आठवी माळ अर्पण करीत आहे. या परिसरातील ही एकमेव जलदेवता आहे. तिच्या नावातच ती ‘जलासरा’ असल्याचे सुचित होत आहे.  पिरंदवणेच्या टोळवाडीचा चढ चढला की पुढे मोरेश्वर मंदिराजवळच शिंदेवाडी येथे श्री धरणकरणीचे छोटेसे मंदिर आहे. अतिशय निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे. धरणकरणी स्थानाशेजारील  ग्रामदेव श्री सप्तेश्वराचे निसर्गरम्य मंदिर. काही देवता या भूमका असतात. त्या भूस्थळातून अवर्तीण झाल्याच्या खुणा दाखवतात. काही क्षेत्रदेवता असतात. त्या दूर निर्जन वस्तीत कोठेतरी सड्यावर, माळावर, कातळावर एकट्याच वसलेल्या असतात. तर काही देवता या जलदेवता असतात. त्या पाण्याच्या मुखाशी, स्थानाशी आढळतात. कोकणात त्यांना ‘जलासरा’ म्हणतात. या जलासरांचे वैशिष्ठ हे की, त्या जलरूप असल्याने त्यांना जलदेवता म्हणतात. पाण्याच्या ठिकाणीच त्यांची वस्ती असते.  निसर्गरम्य  वाडी काहीवेळा नदी हीच देवी, मातास्वरूप पुजली जाते. (अर्थात नद्यानीच एकेकाळी या देशाला समृध्द बनविले. भारतात सिंधू, सरस्वती या...

सातवी माळ: श्री महालक्ष्मी

Image
सातवी माळ: श्री महालक्ष्मी सातव्या माळेचं हे दैवत म्हणजे अखंड बसणी पंचक्रोषीसह चाकरमान्यांचा अतीव श्रध्देचा विषय आहे. महालक्ष्मीचा नवरात्रीतला थाट.. महालक्ष्मीचा शिमगोत्सवी रूबाब.. आणि भक्तांमध्ये महालक्ष्मीचा असलेला दरारा.. हे सारंच न्यारं.. भव्य.. विलोभनीय आहे. महालक्ष्मीविषयी लिहावे तेवढे थोडे, बोलावे तेवढे कमी आहे. सातव्या माळेत फक्त महालक्ष्मीचा शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न.. बसणी गावातील महालक्ष्मी-रवळनाथ हे देवस्थान सडये-पिरंदवणेसह बारा वाड्याचं ग्रामदैवत आहे. यामध्ये प्रामुख्याने पिरंदवणे, वाडाजून, सडये, बसणी, आरे, काळबादेवी, कासारवेली याअंतर्गत येणार्‍या अनेक वाड्यांचा समुह महालक्ष्मीचरणी लीन झालेला पहायला मिळतो. (यातील रवळनाथ हा कोकणचा स्वामी आणि शेतकर्‍यांचा देव आहे. रवळनाथाचा भक्त संपद्राय हा अखंड कोकणात मोजता येणार नाही एवढा मोठा आहे. मात्र या लेखमाळांमध्ये फक्त ‘देवी’ंचा शोध घेत असल्याने महालक्ष्मीचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया.)  रत्नागिरीत महालक्ष्मीची देवालये मोठ्या संख्येने आहे. सडये-पिरंदवणे केंद्रस्थान गृहित धरून कोतवडे बाजारपेठ येथे महालक्ष्मी मंदिर आहे. त्याचप्...