नववी माळ: श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई

नववी माळ: श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई नवरात्रीच्या शेवटच्या नवव्या माळेत एकत्रितपणे आणि एकरूप असलेल्या तीन बहिणी- श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. या तिन्ही देवता केळये ग्रामी वसल्या आहेत. मात्र सडये-पिरंदवणेसह समस्त बारा वाडेकरांचा त्यांचीशी असलेला श्रध्दाभाव हा शब्दांपलिकडला आहे. या देवतांची ग्रामप्रदक्षिणा बंद झाल्यानंतरही हा श्रध्दाभाव कमी झाला नाही, यावरून जनमानसावरील ‘मातृदेवतांचे गारूड’ लक्षात येईल. रत्नागिरी जिल्ह्यात नवलाई, पावणाई, वाघजाईची अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. त्यामुळे या तिन्ही देवता सर्वांनाच परिचित आहेत. विशेष म्हणजे केळये गावातील या तिन्ही ग्रामदेवता भूमका स्वरूपातील आहेत, हे त्यांचे प्राचीनत्व अधोरेखित करते. जरी त्या भूमका असल्या तरी त्यांची पालखीतील रूपे ही अतिशय विलोभनीय आहेत. केळये ग्रामी या देवतांची एकाच ठिकाणी मंदिर नाहीत, तर ती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. सडये-पिरंदवणे गावाची श्री देवी भराडणीपासून सीमा ओलांडली की या तिन्ही देवतांचे कार्यक्षेत्र सुरू होते. अर्थात पलिकडच्या भागात केळये गाव लागते. या तिन्ही देवता आक्रमक...