मनोगत

स.न.वि.वि. ‘गावकीच्या पारावर’ आपणां सर्व वाचक, हितचिंतकांचे हार्दिक स्वागत! आजपर्यंत लिहता-लिहता आपणां सर्वांच्या ज्या शुभेच्छा मिळाल्या, त्याच शुभेच्छ्यांच्या जोरावर आज हे ब्लॉगच्या घरात पहिले पाऊल टाकत आहे. यानिमित्ताने प्रथमच ब्लॉगच्या माध्यमातून अवघ्या जगभरात पोहोचण्याची संधी मिळाली आहे. लहानपणापासूनच ग्रामीण जीवनाची साथसंगत लाभली. हे ग्रामीण जीवन जितकं मजेदार आणि वैविधतेनं नटलेलं आहे, तितकचं ते समस्यांनी वेढलेलं आहे. इथं एकमेकाविषयी कमालीचा जिव्हाळा आहे.. मायेचा उबारा आहे.. या जिव्हाळ्यामुळे इथला माणूस एकमेकांशी बांधला गेला आहे. इथं अज्ञान आहे.. रूढी आहेत.. परंपरा आहेत.. आणि त्यातही तो कमालीचा बांधला गेला आहे. हेच चित्र आयुष्याच्या उभारत्या टप्प्यावर माझ्याभोवती पिंगा घालू लागलं, आणि कागदावर उतरू लागलं. यथावकाश चाचपडत चाचपडत ग्रामीण कथा लेखनाचा प्रारंभ झाला. आजपर्यंत मी लिहलेल्या सार्याच कथांची पार्श्वभूमी ग्रामीण आहे.. प्रत्येक कथेत एक गाव आहे.. गावात गावकर आहे.. कधी तो खलनायक आहे.. कधी तो गावाचा कर्ता कारभारी आहे.. विषेश म्हणजे सार्याच कथा ‘जिव्हाळा’, ‘...