फुल परमिशन
दुपारी बारा पंचावन्नचं लेक्चर संपल, आणि त्याला जरा हलकं वाटलं. तो बाहेर आला. गर्दीच्या कोलाहलात काही पोर चिंचेच्या झाडाखाली.. काही कॅन्टीनकडे... काही लायब्ररीकडे धावत होती. सकाळचं कॉलेज असल्याने त्याने काही खाल्लं नव्हंत. भूक चांगलीच लागली होती. त्यात सायकोच्या लेक्चरला त्याचं डोक मॅडमने पिकवलं होतं. तोच समोर त्याला त्याचा हरी दिसला. खरे त्याचे नाव सागर, पण त्याच्या बापाचे नाव श्रीहरी (कट्ट्यावर कुणीच कुणाला नावाने हाक मारत नाही, बापाचे नाव हीच एखाद्याची ओळख) सागर येताना कट्टयावर दिसला रे दिसला की एकच कोलाहल होतो,
‘‘... दे रे हरी खाटल्यावरी... मग एकच खॅक... खॅक...’’
तो त्याच्याकडेच सरकला, सागर नुकताच आला होता. सेंट वगैरे मारून. याने छेडलं,
‘‘काय रे काय विषेश... वाढदिवस परवा झाला...’’
‘‘नाय रे सहजचं... झालं लेक्चरं...?’’
लेक्चरचं नाव काढताच तो वैतागला, ‘‘.. ऐला त्या सायकोच्या कॅटरीनाने डोकं खाल्लं यार... चल जावया कॅन्टीनमध्ये, वैंताग आला यार नुसता...’’
तो म्हणाला.‘‘... हं जा तू, आता बारा पंचावन्नचं लेक्चर संपलं ना, आता ती येईल, आमची अपॉमेंट ठरलेय...’’- सागर
‘‘ऐला खरचं... कुठं कुठं...?’’ याची उत्सूकता ताणली.
‘‘तुला काय करायचं, तुला सांगा आणि सगळीकडे करा.. तु जा जा, ती येईल आता. आणि सांगू नको कोणाला... आणि आमची भवानीमाता होती काय रे सायकोच्या लेक्चरला?’’
सागरने त्याला विचारलं तसा तो काहीसा भांबावला.
‘‘ अं... अं.. होती वाटतं, माझं नाय लक्ष...’’
(नाही लक्ष कसं? सारं लक्ष तर तीच्याकडेच लागलं होतं, पण त्या मॅडमच्या... मनातलं वाक्य त्यानं मनात ठेवलं) ही भवानी माता म्हणजे सागरची मोठी बहिण, पण सागरवर भारी तोरा दाखवते. मोठी सिन्सिअरपणाचा आव आणते. ‘‘ ऐला ही घरी चाड्या सांगणार लेक्चरला अटेन्ड केलं म्हणून... ऐला स्वत: करना स्वत:चा अभ्यास, या पोरी कॉलेजला जातात म्हणजे ना डोक्याला तापच आहे आमच्या...’’ सागर वैतागला.
‘‘... असू दे रे, बहीण आहे तुझी...’’
याला पुळका आला. येणारच... कारण सागरची बहीण ही याची ‘लाईन’.
बरेच दिवस ही लाईन सुम्ममध्ये चालू आहे. विशेष म्हणजे दोघांकडून सिंग्नल होता. एकच सबजेक्ट असल्याने सारं काही सुरळीत जूळून आलं होतं. कमालीची गोष्ट म्हणजे कट्ट्यावर कुणालाही याची कल्पना नव्हती. कट्ट्यावर आलं म्हणजे तीच्या भावाला कळणार, आणि तो तर आपला फंटर... कळंल तर मात्र राडा होणार हे ठरलेलं... त्यामुळे तो सावध होता. गंमत म्हणजे व्हॉट्सऍपवरून सारी लिंक लागली, याने हाय पाठवलं, तीची स्माईल आली...
‘‘ चल निघतो मी, ती बघ आलीच...’’
सागर सटकला.आता सागर अस्वस्थ झाला, साले लोकं बघा... आपल्या गर्लफे्रण्डबरोबर फिरायला जातात, आणि आम्ही, साधं पोरीकडे बघायचं म्हटलं तरी पंचाईत... काय करू आणि काय नको... असं त्याला झालं. व्हाट्सऍप चालू केलं. पाहिलं. ती ऑफलाईन... ती कायमचीच ऑफलाईन असते. तो आणखीनच वैतागला. मग फोनच लावला,
‘‘कुठे आहेस? ... येतेस काय...?’’
‘‘कुठे...?’’
‘‘चल ना... काही कळत नसल्यासारखे किती प्रश्न विचारशील...?’’
ती लगेच तयार झाली. तो बाईकला कीक मारत सुसाट निघाला, वाटेतच ती भेटली... बस... तो खुश. आता मगाची भूक वगैरे काही उरली नव्हती... दोघंही रत्नागिरीच्या बीचवर आली. थंडबिंड झालं... हातात हात आले, गप्पा सुरू झाल्या.
‘‘कसं होईल गं आपलं...?’’ तो चिंतेनं म्हणाला.
‘‘का रे...’’
‘‘घरच्यांना कळलं तर काय होईल... परमीशन मिळेल आपल्याला? ..अजून कट्ट्यावर पण नाही कळंलयं, तुझ्या भावाची भारी भिती वाटते... तसा आहे तो चांगला, पण आपल्या बहिणीची भानगड म्हणजे कुठचाही भाऊ जरा जास्तच भाव खातो, आणि माझी भानगड तुझ्याशीच आहे म्हटल्यावर काही खरं नाही गं...’’
तेवढ्यात वार्याचा झोत आला, हा वारा काहीतरी बदल घडवेल असचं जणू काही तो संकेत देत असावा. वार्यानं उडालेली तीची बट त्याने आपल्या हाताने मागे सारली.
‘‘आधी तू नोकरीचं बघ, मग परमीशन लगेच मिळेल..’’
तीनं सुचवलं .नोकरी म्हटल्यावर त्याच्या पोटात गोळाच आला...
तो गुरगरत म्हणाला, ‘‘तोपर्यंत असंच नुसतं भेटत रहायचं...?तु तर ऑनलाईन पण नसतेस, आणि कायम पुढच्या बेंचवर सिन्सिअरसारखी बसतेस. बघायला पण मिळत नाय, त्या सायकोच्या मॅडमला कळलंय वाटतं आपलं... आज डोकं खाल्लनं..’’
ती हसू लागली.
‘‘काय पाहतोस...?’’
‘‘तुला पाहतो... छान दिसतेस..’’
तीनं आईस्क्रिम संपवला, तोच तीच लक्ष समोरच्या तरूणाकडे गेलं... ती दचकली. सरकन उठली.
‘‘ए वाट लागली...’’
‘‘काय झालं?’’
‘‘तो बघ भाऊ...’’
‘‘बापरे... ऐला हा पण इथंच येणार होता...’’
‘‘म्हणजे, तुला ठावूक होतं तो इथं येणार होता ते.. कोण आहे त्याच्याबरोबर.. थांब बघतेच मी...’’
‘‘ए शाने तू बगशील, पण आपली वाट लागेल त्याचं काय. अरे बापरे तो बघणार वाटतं आपल्याला... तो बघ इकडंच येतोय वाटतं... चल चल.. लप कुंठतरी, मी कटवतो त्याला...’’
‘‘आज जर आपल्याला पकडलं तर घरी काही खरं नाही..’’
रोज सागरपुढे तोरा दाखवणारी ती आज मात्र चांगलीच घाबरली होती.
‘‘काय करू?’’
‘‘त्या टेबलवर तिकडे तोंड करून बस... दिसणार नाही अशी, मी बघतो.’’
सागर तंद्रीत पुढे येत होता. त्यानेच विचारलं, ‘‘काय रे इकडे येणार होतास काय?’’
‘‘अरे... तू? वासूच आहेस... पाठलाग करत आलास की काय आमचा?, का कोणाबरोबर... अं ... अं...??’’
‘‘नाही रे तसं काही नाही...’’ तो खाली मान घालत म्हणाला. प्रचंड घाबरला होता. सागर कानाच्याखाली हाणतोय असाही क्षणभर भास होत होता. सागरने इकडं-तिकडं पाहिलं.
‘‘ती कोण रे..’’
हा दचकला. पाय लटपटू लागले. गळ्याखाली घाम फुटला.
‘‘कुठं.. कोण...?’’
पायातलं त्राणचं संपलं.. आता काही खरं नाही... ती कापत कापत डोक्यावर ओढणी घेवून पाठमोरी बसली होती.
‘‘भारी आहे रे, टाक कटवून टाक...’’- सागर.
‘‘खरचं...?’’
‘‘मग काय...’’
याला हसावं की रडावं ते कळेना, सागरला कुठे माहित होतं. आपल्या समोर तोरा दाखवणार्या पोरी सुम्ममध्ये फार हुशार असतात, आणि त्यात आपली बहीणसुध्दा आहे ते... काही का असेना अनपेक्षितपणे सागरकडून त्याला मात्र फुल परमिशन मिळाली होती... तो तेथून सटकेपर्यंत तरी त्याच्या जीवात जीव आला होता.
- अमोल

Comments
Post a Comment