आठवी माळ : श्री देवी ईटलाई

आठवी माळ : श्री देवी ईटलाई



आजच्या आठव्या माळेत आज माहिती घेऊया श्री देवी मानाईप्रमाणेच आद्य मातृदेवता असलेल्या श्री ईटलाई या देवतेला. ईटलाई हीसुध्दा सडये-पिरंदवणे-बसणी या महालातील प्रमुख प्राचीन देवता आहे, आणि बसणी पंचायतन देवस्थानांच्या जिर्णोध्दार कार्यानंतर ती नव्याने दृष्टीपथात आली आहे. यापूर्वी श्री मानाई व श्री ईटलाई या दोन्ही देवता दुर्लक्षित होत्या. सध्या त्या स्वतंत्र मंदिरात विराजमान झाल्याने त्यांची ओळख पुन्हा नव्याने सर्वांना घडू लागली आहे.


बसणीतील श्री महालक्ष्मी-रवळनाथ पंचायतन देवस्थानापैकी श्री देव रवळनाथ महाराजांच्या मंदिरातच रवळनाथांच्या गाभार्‍याशेजारीच श्री देवी ईटलाईची स्थापना करण्यात आली आहे. श्री ईटलाई देवीची मुर्ती पाषाणाची असून ती नव्याने अतिशय, सुबक, देखणी घडविण्यात आली आहे. ही नव्याने रवळनाथांच्या शेजारी स्थापन करण्यात आली असली, तरी ती नवी देवता नाही. रवळनाथांच्या कार्यक्षेत्रातील ती रवळनाथा इतकीच जूनी, प्राचीन देवता आहे. 


काही अभ्यासकांच्या मते, ईटलाई-ईटलादेवीचा अपभ्रंश ‘शितला’ देवी असा झाला असावा, असे म्हटले जाते. ईटलाई देवतेचा विठ्ठल या देवतेशी काहीही संबंध नाही. ती खूप प्राचीन देवता आहे. ईटलाईला ईटला देवी असेही बोलीभाषेत म्हणतात. रत्नागिरीसह सिंधदुर्गात या देवतेची अनेक मंदिरे आहेत. अनेक गावांची ती ग्रामदेवताही आहे. ही कनिष्ठ देवता आहे.  भूत-पिशाच्च योनीपासून रक्षण करणारी ही देवता मानली जाते. शिळी भाकरी-खारा मासा हा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा या देवीसंदर्भात काही ठिकाणी आहे. याच देवीजवळ गावाची राखण देण्याची प्रथा पाळली जाते.


श्री.अमोल पालये.

मो.9011212984.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई

दुसरी माळ | श्री जोगेश्वरी