Posts

संकासूर (sankasur)

Image
संकासूर समस्त कोकणवासिय आणि चाकरमानी यांच्या जगण्याचे टॉनिक म्हणजे शिमगोत्सव! बारावाड्यांच्या गावदेवाला फुल लागलं, रुपं चढलं की कोकणात पालख्यांचे ढोल वाजू लागतात. गावभोवनीच्या देवांबरोबर गावभोवनीचे खेळे सजतात आणि घरोघरी फिरू लागतात. असा हा कोकणातला शिमगोत्सव अनेकप्रकारे वैशिष्ठपूर्ण आहे. त्यातील एक वैशिष्ठ म्हणजे, हिंदू धर्मात भक्ताने देवालयात जावे, आणि देवाचे दर्शन घ्यावे, असा नियम आहे. कोकणातला शिमगोत्सव मात्र हा नियम दूर ठेवतो. येथे चक्क ग्रामदेव भक्ताघरी उंबरठा ओलांडून घरात येतात. येतात ते येतात, ढोल-ताशांचा शाही गोतावळा घेऊन येतात. दुसरं वैशिष्ठ म्हणजे, पालखीतले देव पौराणिक नाहीत. ब्रम्हा, विष्णू, महेश, राम-लक्ष्मण, कृष्ण असे प्रस्थापित देव नाहीत. पालखीतून गावभेटीला निघणारे देव हे पुराणाबाहेरचे आहेत. त्यांच्याकाही अवतार लिलाही माहित नाहीत, तरीही गेली हजारो वर्षे त्यांनी कोणतंही स्वत:च मार्केटिंग नसताना कोकणवासियांच्या मनावर गारूड केलं आहे. तिसरं विशेष म्हणजे, कोकणातल्या पालख्या पाहिल्या तर त्यात कमीत कमी तीन, जास्तीत जास्त पाच-सहा देव असतात. यातही सर्वाधिक असतात त्या स्त्री देवता....

मी हिजडा.. मी लक्ष्मी

Image
  मी हिजडा.. मी लक्ष्मी - लेखक: लक्ष्मी नारायण त्रिपाठी. (पुस्तक परिचय) पत्रकारितेच्या सुरूवातीला एका वृत्तपत्रातील मुलाखतीने माझे लक्ष वेधले होते. साधारण 2010 सालची गोष्ट असेल.. ती मुलाखत एका वेगळ्या व्यक्तिीची होती. छायाचित्रांमुळे ती मुलाखत चांगली सजली होती. ठाण्यातील पत्रकार अशोक गावकर यांनी त्या मुलाखतीतून त्या व्यक्तिचं म्हण्णं मांडण्यासाठी तीला पुरेपूर जागा दिली होती. दोन-तीनवेळा तरी ती मुलाखत मी वाचली. त्या व्यक्तिचं त्या मुलाखतीमुळे माझ्यावर गारुड निर्माण झालं. त्यानंतर काही दिवसातच त्या व्यक्तिची जन्मकथा.. व्यथा मांडणारी लघुकथा मी लिहली. ती माझी प्रकाशित न झालेली पहिली लघुकथा. ‘धु्रव’ तीचं नाव. पण अखेरपर्यंत ती कथा कधीच मार्गा लागली नाही. कारण, त्या व्यक्तिला पुरेपूर जाणून घेणं, माझ्यासारख्याला शक्य नव्हतं. मुळात मी तेव्हा लिहतच नव्हतो.. ती मुलाखत आणि माझी पहिली कथा जिच्यामुळे लिहली गेली, ती असामी म्हणजेच ‘मी हिजडा.. मी लक्ष्मी’ या पुस्तकाची लेखिका आणि तृतीयपंथी- लक्ष्मी नारायण त्रिपाठी. आयबीएन लोकमतवर जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी लोकप्रिय गे्रट-भेट कार्यक्रमातही तीची ...

श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई

Image
श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई नवरात्रीच्या शेवटच्या नवव्या माळेत एकत्रितपणे आणि एकरूप असलेल्या तीन बहिणी- श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. या तिन्ही देवता केळये ग्रामी वसल्या आहेत. मात्र सडये-पिरंदवणेसह समस्त बारा वाडेकरांचा त्यांचीशी असलेला श्रध्दाभाव हा शब्दांपलिकडला आहे. या देवतांची ग्रामप्रदक्षिणा बंद झाल्यानंतरही हा श्रध्दाभाव कमी झाला नाही, यावरून जनमानसावरील ‘मातृदेवतांचे गारूड’ लक्षात येईल. रत्नागिरी जिल्ह्यात नवलाई, पावणाई, वाघजाईची अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. त्यामुळे या तिन्ही देवता सर्वांनाच परिचित आहेत. विशेष म्हणजे केळये गावातील या तिन्ही ग्रामदेवता भूमका स्वरूपातील आहेत, हे त्यांचे प्राचीनत्व अधोरेखित करते. जरी त्या भूमका असल्या तरी त्यांची पालखीतील रूपे ही अतिशय विलोभनीय आहेत. केळये ग्रामी या देवतांची एकाच ठिकाणी मंदिर नाहीत, तर ती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. सडये-पिरंदवणे गावाची श्री देवी भराडणीपासून सीमा ओलांडली की या तिन्ही देवतांचे कार्यक्षेत्र सुरू होते. अर्थात पलिकडच्या भागात केळये गाव लागते. या तिन्ही देवता आक्रमक आहेत. युध...

श्री धरणकरीण

Image
आठवी माळ: श्री धरणकरीण धरणकरणीचे  स्थान सडये-पिरंदवणे क्षेत्रातील अंत्यत निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री धरणकरणीला आठवी माळ अर्पण करीत आहे. या परिसरातील ही एकमेव जलदेवता आहे. तिच्या नावातच ती ‘जलासरा’ असल्याचे सुचित होत आहे.  पिरंदवणेच्या टोळवाडीचा चढ चढला की पुढे मोरेश्वर मंदिराजवळच शिंदेवाडी येथे श्री धरणकरणीचे छोटेसे मंदिर आहे. अतिशय निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे. धरणकरणी स्थानाशेजारील  ग्रामदेव श्री सप्तेश्वराचे निसर्गरम्य मंदिर. काही देवता या भूमका असतात. त्या भूस्थळातून अवर्तीण झाल्याच्या खुणा दाखवतात. काही क्षेत्रदेवता असतात. त्या दूर निर्जन वस्तीत कोठेतरी सड्यावर, माळावर, कातळावर एकट्याच वसलेल्या असतात. तर काही देवता या जलदेवता असतात. त्या पाण्याच्या मुखाशी, स्थानाशी आढळतात. कोकणात त्यांना ‘जलासरा’ म्हणतात. या जलासरांचे वैशिष्ठ हे की, त्या जलरूप असल्याने त्यांना जलदेवता म्हणतात. पाण्याच्या ठिकाणीच त्यांची वस्ती असते.  निसर्गरम्य  वाडी काहीवेळा नदी हीच देवी, मातास्वरूप पुजली जाते. (अर्थात नद्यानीच एकेकाळी या देशाला समृध्द बनविले. भारतात सिंधू, सरस्वती या...

पाचवी माळ: श्री महालक्ष्मी

Image
पाचवी माळ: श्री महालक्ष्मी सातव्या माळेचं हे दैवत म्हणजे अखंड बसणी पंचक्रोशीसह चाकरमान्यांचा अतीव श्रध्देचा विषय आहे. महालक्ष्मीचा नवरात्रीतला थाट.. महालक्ष्मीचा शिमगोत्सवी रूबाब.. आणि भक्तांमध्ये महालक्ष्मीचा असलेला दरारा.. हे सारंच न्यारं.. भव्य.. विलोभनीय आहे. महालक्ष्मीविषयी लिहावे तेवढे थोडे, बोलावे तेवढे कमी आहे. सातव्या माळेत फक्त महालक्ष्मीचा शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न.. बसणी गावातील महालक्ष्मी-रवळनाथ हे देवस्थान सडये-पिरंदवणेसह बारा वाड्याचं ग्रामदैवत आहे. यामध्ये प्रामुख्याने पिरंदवणे, वाडाजून, सडये, बसणी, आरे, काळबादेवी, कासारवेली याअंतर्गत येणार्या अनेक वाड्यांचा समुह महालक्ष्मीचरणी लीन झालेला पहायला मिळतो. (यातील रवळनाथ हा कोकणचा स्वामी आणि शेतकर्यांचा देव आहे. रवळनाथाचा भक्त संपद्राय हा अखंड कोकणात मोजता येणार नाही एवढा मोठा आहे. मात्र या लेखमाळांमध्ये फक्त ‘देवी’ंचा शोध घेत असल्याने महालक्ष्मीचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया.)  रत्नागिरीत महालक्ष्मीची देवालये मोठ्या संख्येने आहे. सडये-पिरंदवणे केंद्रस्थान गृहित धरून कोतवडे बाजारपेठ येथे महालक्ष्मी मंदिर आहे. त्याचप्रम...

श्री केळबाई

Image
श्री केळबाई आजची सहावी माळ सडयेतील मयेकर कुटुंबियांचे कुलदैवत श्री केळबाई देवीच्या नावाने वाहत आहे. शिवलकर कुटुंबियांचे कुलदैवत सातेरीचा जसा मोठा भक्तसंपद्राय आहे, त्याप्रमाणे मयेकर कुंटुंबियांच्या केळबाईचाही खूप मोठा भक्तसंपद्राय रत्नागिरीसह सिंधुदुर्ग-गोव्यात आहे. रत्नागिरीसह सडये गावातील मयेकर बांधव हेही शिवलकर कुंटुंबियांप्रमाणे गोव्या राज्यातील ‘मये’ या गावचे आहेत. पोर्तुर्गीज काळात त्यांनी स्थलांतर केल्यानंतर आपलं कुलदैवत श्री केळबाई देवी आपल्यासोबत घेवून आले. सडये पंचक्रोशीत या कुलदैवताचे मंदिर कोठेही नव्हते, मात्र अलिकडे सडये गावच्या सीमाक्षेत्र परिसरात आरे या गावी केळबाई देवीची मुर्ती स्थापना करण्यात आली आहे. मुर्ती पाषाणाची असून अतिशय सुंदर आहे. याठिकाणी देवीची नैमित्तिक पुजा, सण-उत्सव मयेकर बांधवातर्फे साजरे करण्यात येतात. सिंधुदुर्गात देवीला बाई म्हणण्याची प्रथा आहे. अवघ्या कोकणातील प्रसिध्द लोकदैवत भराडीला रत्नागिरीत भराडीण देवी असे संबोधतात, तर सिंधुदुर्गात तीला भराडीबाई असे म्हणतात. केळबाईलाही असेच बाई उपनाव लावण्यात आले आहे. देवीचे मुळ स्थान केळ या वृक्षाखाली आहे. त्याम...

सातेरीचा देव्हारा

Image
सातेरीचा देव्हारा शिवलकर बांधवांचे कुलदैवत:  श्री सातेरी देवस्थान, शिवोली-गोवा कोकणात सर्वात मोठा भक्ती संपद्राय कोणता असेल तर तो रवळनाथ आणि सातेरी.  ‘सडये’ या गावाचे नामाभिमान गोव्यातील सडये या गावावरून देण्यात आले आहे. त्याला कारणही तसेच ठाम आहे. गोव्यातील सडये या गावातील तमाम शिवलकर, मयेकर ही कुटुंबे गोव्यातून रत्नागिरीत पोर्तूगीज काळात स्थलांतरीत झाली. तेव्हा त्यांनी येथे येताना आपली संस्कृती येथे आणलीच, मात्र आपलं गावही ते येथे येताना घेवून आले. ते गाव म्हणजे आजचे सडये.  रत्नागिरीतील सडये गावाच्या खाडीकिनारी भागात शिवलकरांची वस्ती आहे. हे शिवलकर गोव्यातील शिवोली गावचे. त्यांची कुलदेवता म्हणजे सातेरी. तीच्यावर त्यांची प्रगाढ श्रध्दा. या सातेरीचे भव्य देवस्थान सडये येथे नाही, मात्र श्रध्देकारणे काही वर्षापूर्वी शिवोली सेवा मंडळ, सडये- शिवलकरवाडी यांनी देवस्थान उभारले आहे. हे देवस्थान पहायला गेल्यास छोटेखानी आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख येथे ‘सातेरीचा देव्हारा’ केला आहे.  दैंनंदिन पुजा येथे होत असते. काही वर्षापासून येथे घटस्थापनेचा उत्सव साजरा केला जातो. येथिल...

चौथी माळ: श्री भराडीण

Image
चौथी माळ : श्री भराडीण तिसर्‍या माळेत आज जाणून घेऊया सडये-पिरंदवणेच्या सड्यावरील श्री भराडीण देवीला. बसणीचा सडा संपून सडये-पिरंदवणेतील सड्याच्या टोकाला आणि आडोम-केळ्ये गावाच्या मध्याला कातळावर श्री भराडीण मंदिर वसले आहे. सडा असल्याने मंदिर पुर्णत: निर्जन आहे. मात्र येथे असणारा आजही पाण्याने भरलेला बारव प्रकारातील सुका आड येथे एकेकाळी वस्ती असल्याचे सुचित करतो. अगदी अलिकडे याठिकाणी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरीच्या एनएसएस विभागामार्फत याठिकाणी भराडीण देवीचे छोटेखानी टुमदार मंदिर उभारले आहे, जे विस्तीर्ण कातळावरून पाहणे खूपच सुंदर दिसते. भूमका देवी सिंधुदुर्गात आंगणेवाडीच्या भराडीबाईची (देवीची) यात्रा प्रसिध्द आहे. ती भराडी आणि सडये-पिरंदणेच्या सड्यावरील भराडीण वेगवेगळी नसून एकच आहे. सडये-पिरंदवणेच्या जवळ असलेल्या कासारवेलीत भराडीण देऊळ आहे. मात्र ते ऐन वस्तीत आहे. (कदाचित ती वस्ती अलिकडील असावी.) भराडीण ही भुमका स्वरुपातील देवी आहे. भूमका म्हणजे जमिनीतूनच प्रगट झालेेली, किंवा भूमीशी संबधित. त्यामुळे भूस्थान ही देवी मानली जाते. सडये-पिरंदवणेच्या सड्यावरील देवळात तीची चार भुजा, मुख...