तिसरी माळ: श्री जाखमाता

 तिसरी माळ: श्री जाखमाता


सडये-पिरंदवणेच्या सडा-कातळ भागात श्री जाखमाता देवीचे प्राचीन स्थान आहे, आज ते कमालीचे दुर्लक्षित झाले आहे. 

कोकणात जाखमातेची अनेक मंदिरे आहेत, तेथे मोठा उत्सवही साजरा केला जातो. सडये-पिरंदवणेतील श्री श्रेत्र जाखमाता देवस्थान सीमेवर वसले आहे. सडये-पिरंदवणे आणि केळ्ये या दोन गावांच्या डोंगरी सीमेवर जाखमातेचे स्थान आहे. ही देवी सीमेवर वसली असल्याने तीला क्षेत्रदेवता असे म्हणतात. क्षेत्रदेवता या गावांच्या-सीमांचं रक्षण करतात. म्हणून सड्ये-पिरंदवणे गावांचे रक्षण जाखमाता करते अशी भाविकांची श्रध्दा आहे. जाखमातेचीही मुर्ती नाही. तीसुध्दा भुमका-तांदळा स्वरुपातील देवता आहे. 

केवळ प्रासंगिक वेळी तिथे आज पुजा अर्चा होते. तर काही भाविकांकडून वार्षिक पुजाविधी केला जातो. विशेष म्हणजे संगमेश्वरात जाखमातेचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. येथिल शिंपणे उत्सवाला सडये-पिरंदवणेतून युवक मोठ्या संख्येने जातात, मात्र स्वत:च्या जन्मभूमीतील क्षेत्रदेवता जाखमातेकडे कुणीच जात नाही. 

कोकणात अनेक ठिकाणी जाखमाता देवीची मंदिरेही आहेत. जाखडी या कोकणातील पारंपरिक नृत्यकलेच्या नावाशी साधर्म्य असलेला जखडणे या शब्दाच्या उत्पत्तीतून जाखमाता हा शब्द आलेला आहे. त्यामुळे भक्तांशी घट्ट नाते सांगणारी देवी असा तर्क काढला जातो. आजही या जाखमाता देवीचे महात्म्य भक्तांच्या श्रद्धेमुळे अधोरेखित झालेला आहे. (या देवस्थानाविषयी सध्यातरी अधिक माहिती उपलब्ध नाही.)

लेखन: अमोल पालये, 

सडये-पिरंदवणे. मो.9011212984.


Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू