आठवी माळ: श्री धरणकरीण

आठवी माळ: श्री धरणकरीण


धरणकरणीचे स्थान

सडये-पिरंदवणे क्षेत्रातील अंत्यत निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री धरणकरणीला आठवी माळ अर्पण करीत आहे. या परिसरातील ही एकमेव जलदेवता आहे. तिच्या नावातच ती ‘जलासरा’ असल्याचे सुचित होत आहे.  पिरंदवणेच्या टोळवाडीचा चढ चढला की पुढे मोरेश्वर मंदिराजवळच शिंदेवाडी येथे श्री धरणकरणीचे छोटेसे मंदिर आहे. अतिशय निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे.

धरणकरणी स्थानाशेजारील 
ग्रामदेव श्री सप्तेश्वराचे निसर्गरम्य मंदिर.


काही देवता या भूमका असतात. त्या भूस्थळातून अवर्तीण झाल्याच्या खुणा दाखवतात. काही क्षेत्रदेवता असतात. त्या दूर निर्जन वस्तीत कोठेतरी सड्यावर, माळावर, कातळावर एकट्याच वसलेल्या असतात. तर काही देवता या जलदेवता असतात. त्या पाण्याच्या मुखाशी, स्थानाशी आढळतात. कोकणात त्यांना ‘जलासरा’ म्हणतात. या जलासरांचे वैशिष्ठ हे की, त्या जलरूप असल्याने त्यांना जलदेवता म्हणतात. पाण्याच्या ठिकाणीच त्यांची वस्ती असते. 
निसर्गरम्य वाडी
काहीवेळा नदी हीच देवी, मातास्वरूप पुजली जाते. (अर्थात नद्यानीच एकेकाळी या देशाला समृध्द बनविले. भारतात सिंधू, सरस्वती या नद्यांना देवतेचेच स्वरूप आहे.) धरण म्हणजे पाणी अडण्याची जागा. नैसर्गिकरित्या जेथे पाणी साचते तेथे धरणकरणीचे स्थान पुर्वपरंपरागत पुजले गेले आहे. तसेच ते शिंदेवाडी (मु.पो.भावेआडम) येथे आहे. 

महसुलीदृष्ट्या शिंदेवाडी हा भाग मु.पो.भावेआडम या गावात येतो, मात्र सडये-पिरंदवणेपासून तो खूपच जवळ आहे. शिंदेवाडीत धरणकरणीचे छोटेखानी मंदिर आहे. मंदिरात मुर्ती नाही, तर तांदळा आहेत. या तांदळा म्हणजेच धरणकरणीचे प्रतिकात्मक रूप. वास्तवात मात्र वाहणारा ओढाच धरणकरीण अर्थात जलदेवी आहे. मंदिराच्या अगदी चवथर्‍याला लागूनच दगडांमधून पाण्याचा झरा वाहत असतो. पावसात तो मोठा होतो. 

ही वाडी म्हणजे जणू दगडांची वीणच. मोठमोठोल दगड, अवघड चढ, त्याला पोखरून केलेल्या पाखाड्या, वाटा आणि चढ उतारात वसवलेली घरं.. बाकी घनदाट जंगल. म्हणूनच टूमदार धरणकरणीचं देवूळ मागे ओढा आणि घनदाट झाडी.. हे चित्र पावसात पाहणे म्हणजे खरोखरच्या धरणकरणीला जवळून पाहण्याचा अनुभव..

कोतवडेतील लावगणवाडी येथेही अशाचप्रकारे नैसर्गिक धरण क्षेत्रात धरणकरणीचे स्थान आहे.


- अमोल पालये, सडये-पिरंदवणे.

मो.9011212984


x

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू